mini tractor anudan yojana: ट्रॅक्टर घेण्यासाठी समाज कल्याणकडून मिळणार 90 टक्के अनुदान, कसा आणि कुठे करालं अर्ज?

mini tractor anudan yojana: राज्यातल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिलांना सक्षम बनविण्याकरता समाजकल्याण विभागाच्या वतीने मिनी ट्रॅक्टर (mini tractor) योजना सुरू करण्यात आली असून यासाठी तब्बल ९० टक्के अनुदान मिळते. या योजनेंतर्गत बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपकरणे खरेदी करण्यासाठी 3 लाख 15 हजार एवढ्या रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. यामध्ये बचत गटाला फक्त 10 टक्के एवढी रक्कम म्हणजेच फक्त 35 हजार रुपये भरावे लागतात.

mini tractor anudan yojana
mini tractor anudan yojana

mini tractor anudan yojanaची उद्दिष्टे

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर (mini tractor) आणि उपसाधने म्हणजेच कल्टीव्हेटर/रोटाव्हेटर/ट्रेलर घेण्यासाठी सदरील योजना सुरू करण्यात आलेली आहे.

पात्रता आणि निकष…

 • अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व महिला सदस्य हे महाराष्ट्राचे रहीवासी असावेत.
 • स्वयंसहाय्यता बचत गटामधील कमीत कमी 80 टक्के महिला सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावेत, शिवाय बचत गटाचे अध्यक्ष, सचिव हे अनुसूचित प्रवर्गामधील असावेत.
 • ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधानांची खरेदी करण्यासाठी रु. 3.15 लाख एवढी रक्कम शासकीय अनुदान म्हणून अनुज्ञेय राहील.
 • ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यावर बचत गटांची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.

अशी असेल निवड प्रक्रिया….

 • सर्वप्रथम बचत गटातील लाभार्थी सदस्याची पूर्ण व अचूक माहिती भरल्यावर ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.
 • तुम्ही सादर केलेला अर्ज वैध ठरल्यास सदरील अर्जाची प्रिंट ही सर्व सभासदांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
 • नंतर वैध ठरलेल्या सर्व अर्जातून लॉटरी पद्धतीने चिठ्ठी टाकून लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
 • लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या ट्रॅक्टर आणि त्यांच्या उपकरणांची पावती ऑनलाइन पद्धतीने सादर करवी. लक्षात ठेवा, ऑनलाइन सादर केलेल्या पावतीवर विक्रेत्याचा GST क्रमांका बरोबरच पावतीचा क्रमांक, उपकरणांचे अनु क्रमांक यांचे विस्तृत तपशील असणे आवश्यक आहे.
 • मूळ खरेदीच्या पावतीबरोबरच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात नोंद करणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या वाहनांना RTO मार्फत मिळणारा वाहनाचा परवाना ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
 • अनुदाना अंतर्गत घेतलेल्या मूळ ट्रॅक्टरचा मूळ परवाना संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग कार्यालय येथे जमा करणे बंधनकारक आहे.

इथे साधावा संपर्क

सदरील योजनेच्या अधिक माहितीकरिता https://mini.mahasamajkalyan.in किंवा https://sjsa.maharashtra.gov.in/mr या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

किंवा तुमच्या जिल्ह्यांचे संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग कार्यालय येथे संपर्क साधावा.

mini tractor anudan yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!