राज्यात लवकरच होणार साडेसात हजार पोलीस पदांची भरती; भरतीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..

औरंगाबाद : (Recruitment of seven and a half thousand police posts will soon be held in the state..) राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असून, लवकरच सर्व विभागांत तब्बल ८० हजार नोकर भरती करण्यात येणार असून त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवाय, औरंगाबादेतील टी. व्ही. सेंटर परिसरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसराच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

येणाऱ्या काही महिन्यामध्ये राज्यात साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. औरंगाबादेतील टी. व्ही सेंटर चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री यांनी अभिवादन करताना तिथे पोलीस भरतीची तयारी करणारे मुलं जमली होती.

मुख्यमंत्री शिंदे येताच तरुणांनी पोलीस भरती-पोलीस भरती अशा घोषणाबाजी करायला सुरवात केली. तरुणांच्या घोषणा ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काही महिन्यामध्ये राज्यात साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केल्यावर तरुणांनी सुद्धा टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या घोषणेचं स्वागत केले.

ठाकरे सरकारने सुद्धा केली होती घोषणा
राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, तत्कालिन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यामध्ये दोन टप्प्यात पोलिस भरती करणार असल्याची घोषणा केलेली होती. त्या घोषणेनुसार, पहिल्या टप्प्यातील 5 हजार पोलिसांची भरती पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यामध्ये 7231 पदांसाठी भरती केली जाणार होती. मात्र, सत्तांतर झाल्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहिलेली पोलिस भरतीची घोषणा केल्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!