bad cibil LIC Policy Loan 2024 : तुम्हाला पैशांची गरज असल्यास LIC पॉलिसीवर “या” सोप्या पद्धतीने घेऊ शकता कर्ज..

bad cibil LIC Policy Loan : आपल्या सगळ्यांच्याच जीवनात बऱ्याच वेळा अचानक आणि अत्यंत तातडीची पैशांची गरज भासते, मात्र आपल्याला लागणारा पैसा आपल्याजवळ पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे आपण हतबल होऊन वेगवेगळ्या प्रकारे पैश्यांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्यासाठी विविध बँका अथवा वित्तीय संस्थांकडे कर्जासाठी अर्ज करतो, किंवा सावकार कडे हात पसरतो, मात्र तिथे प्रश्न येतो तो CIBIL Score चा. मात्र आज आम्ही तुम्हाला अश्या लोन बद्दल सांगणार आहोत, ज्या लोन घेण्यासाठी cibil score चांगला असण्याची काही एक गरज राहत नही.

bad cibil LIC Policy Loan
bad cibil LIC Policy Loan

मात्र या व्यतिरिक्त तुम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC च्या माध्यमातून सुद्धा (bad cibil LIC Policy Loan) तुम्ही कर्ज घेता येते, आणि त्यासाठी सिबिल स्कोर असो वा नसो त्याने काहीच फरक पडत नही. कारण आपल्यापैकी जवळपास सगळ्याजणांनीच भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ची पॉलिसी घेतलेली असते तर ही पॉलिसी धारकाला कर्जाची सुविधा देखील पुरवते.

भारत सरकारच्या महत्वपूर्ण योजनांच्या माहितीचे विडियो पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा

आर्थिक आणीबाणीच्या कालावधी मध्ये तुम्ही LIC पॉलिसी वर सुद्धा कर्ज घेऊ शकतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर तुम्ही इतर जागेहून personal loan म्हणजेच वैयक्तिक कर्ज घेतले तर त्या तुलनेत एलआयसीच्या पॉलिसीवर घेतलेल्या कर्जावर तुम्हाला अत्यंत कमी व्याज द्यावे लागते. आता एलआयसीच्या पॉलिसीवर कर्ज घेण्याचे नियम काय आहेत? याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या. (bad cibil LIC Policy Loan)

LIC पॉलिसीवर Loan घेण्यासाठी महत्वाचे नियम

  • तुम्हाला LIC पॉलिसीवर कर्ज घ्यावयाचे असेल असल्यास ट्रॅडिशनल आणि एंडोमेंट पॉलिसीच्या माध्यमातूनच देण्यात येते.
  • तुम्हाला LIC पॉलिसीवर देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम ही तुम्ही LIC पॉलिसीचे किती हप्ते भरलेले आहे, किंवा एक रकमी असलेल्या पॉलिसीचे सरेंडर मूल्य किती आहे त्यावर ठरत असून LIC पॉलिसीच्या एकूण सरेंडर मूल्याचे 80% ते 90% पर्यंतचे कर्ज मिळते.
  • LIC पॉलिसीवर देण्यात येत असलेल्या कर्जावर व्याजदर हा 9 टक्के एवढा असतो. परंतु अनेकदा कर्जाची रक्कम ही पॉलिसीधारकांची प्रोफाइलवर सुद्धा अवलंबून असते.

एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठीचे महत्वाचे नियम (bad cibil LIC Policy Loan)

  • जेव्हा पॉलिसीधारक त्याच्या एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी अर्ज करतो तेव्हा कंपनी त्याच्या पॉलिसीचे बॉन्ड गहाण ठेवते.
  • समजा जर तुम्ही घेतलेल्या पॉलिसीवर कर्ज घेतले आणि रकमेची परतफेड करण्यापूर्वीच पॉलिसीचा कालावधी संपला कंपनी तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम आणि व्याज पॉलिसीचे एकूण रकमेतून कापून घेते.

LIC पॉलिसीवर कर्जासाठी असा करा अर्ज?

पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो.

ऑनलाइन पद्धतीने असा करा अर्ज..

जर तुम्हाला ऑनलाईन प्रकारे अर्ज करायचा असल्यास एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन LICच्या ई-सेवामध्ये नोंदणी केल्यावर तुमच्या खात्यामध्ये लॉग-इन केल्यावर तुम्हाला कर्जासाठी अर्ज करता येतो

ऑफलाइन पद्धतीने असा करा अर्ज..

ऑफलाइन प्रकारे अर्ज करायचा असल्यास तुमच्या जवळच्या एलआयसी कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो, लक्षात ठेवा कर्जासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला KYC करण्यासाठी काही कागदपत्रे जसे कि, तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पॉलिसीचे डोक्युमेन्ट सोबत न्यावे लागतात.

शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे? यासाठी कृपया वरील विडियो अवश्य पहा

Similar Posts