काय आहे Solar Panel Subsidy Yojana 2024? या योजनेद्वारे किती मिळेल अनुदान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Solar Panel Subsidy Yojana : भारतातील नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करवा यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामुळेच घर बांधणीसाठी गृहकर्जा बरोबरच घरावर ‘रुफटॉप सोलर पॅनेल’ (Solar Panel Subsidy Yojana) बसवण्यासाठी सुद्धा बँकांतर्फे ग्राहकांना निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच रूफटॉप सोलर योजनेची घोषणा केली असून या योजनेच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी लोकांच्या घरांमध्ये सौरऊर्जा देण्याचा सरकार प्रयत्नशील आहे.

मागील महिन्यात अक्षय ऊर्जा मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि बँकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये असे मान्य झाले होते की बँक रुफटॉप सोलरसाठीचे राष्ट्रीय पोर्टल त्यांच्या ग्राहकांना घर बांधण्यासाठी दिलेल्या कर्जाशी सुद्धा जोडले जाईल. हे ग्राहक वास्तविक डेटामध्ये प्रवेश करण्यास अनुमती देईल.

जनजागृती मोहीम राबवणार

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मोफत वीज योजनेद्वारे भारतातील जवळपास 90 टक्के ग्राहक त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवतील. ग्राहकांना गृहकर्जासोबतच सौरऊर्जा पॅनेलवर सबसिडी (Solar Panel Subsidy Yojana) देऊन, जास्तीत जास्त नागरिकांना त्यांच्या छतावर सौर पॅनेलचा वापर करता येईल. आणि बँका सुद्धा या योजनेत सहभागी होऊन सोलर टॉप पॅनल्सबाबत त्यांच्या ग्राहकांना जागरुक करून त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यास प्रोत्साहित करण्याकरिता जागरूकता मोहीम राबवतील.

सौरऊर्जेद्वारे 1 कोटी लोकांच्या घरांत प्रकाश होणार

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सांगितल्यानुसार रुपटॉप सोलर योजनेचे उद्दिष्ट भारताचे 1 कोटी लोकांच्या घरांमध्ये प्रकाश देण्याचा असून नागरिकांना दरमहा 300 युनिटपर्यंतची वीज मोफत मिळण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामध्ये सरकारने 75 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केलेली आहे. बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाने पर्यावरण, सामाजिक तथा प्रशासन (ESG) फ्रेमवर्क अंतर्गत, बँका आधीच ग्राहकांच्या घरांच्या छतावर सोलर रूफटॉप पॅनेल स्थापित करण्याकरिता कर्ज देणे हे आता प्रत्येक बँकेचे स्वतःचे धोरण असल्यामुळे, आम्ही अगदी लहान आणि मध्यम क्षेत्रामधील उद्योगांना या सरकारी उपक्रमामध्ये सामील होण्याकरिता प्रोत्साहित करून त्यांच्या संस्थांच्या छतावर सोलर फॉर्म टॉप पॅनेल बसवू.

Solar Panel Subsidy Yojanaअंतर्गत सरकार देईल इतके अनुदान.

भारत सरकार सौर पॅनेल बसवण्याकरता सुमारे 60 टक्के एवढी सबसिडी देत असून उरलेला खर्च लाभार्थ्याला स्वत: करावा लागणार आहे. सूर्य घर योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला सबसिडीची संपूर्ण माहिती दिसेल. या माहितीनुसार, लाभार्थ्याला प्रति किलोवॅट 30 हजार रुपये एवढी सबसिडी देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांनी 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनल बसविण्यास 78,000 रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येईल.

समजा जर तुमच्या विजेचा वापर दरमहा 150 युनिट असेल तर तुम्हाला एक किंवा दोन किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवावे लागेल, आणि यावर तुम्हाला 30000 ते 60000 रुपये अनुदान मिळेल. जर का तुम्हाला 150 ते 300 युनिट्स वीज लागत असेल तर तुम्हाला दोन किंवा तीन किलोवॅट्स क्षमतेच्या सोलर पॅनलची आवश्यकता असेल. आणि यावर 60000 रुपयांपासून ते 78000 रुपयांपर्यंतची सबसिडी मिळणार आहे. पण जर का एका महिन्यात 300 युनिटपेक्षा जास्त विजेचा वापर असेल तर तुम्हाला 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचे सौर पॅनेल लावावे लागणार असून त्यावर तुम्हाला 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळेल.

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!