Low Cibil Score Step Up Credit Card | सिबील स्कोअर शिवाय मिळणार क्रेडिट कार्ड, फक्त करावी लागेल 2 हजारांची FD…

Low Cibil Score Step Up Credit Card | आजकाल जवळपासस सगळेच जण क्रेडिट कार्डचा वापरत असतात. परंतु हे क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी तुमचा Cibil Score चांगला असणे अत्यंत गरजेचे असते. मात्र नोकरी करणाऱ्या काही व्यक्तींचा सिबील स्कोर (Low Cibil Score) चांगला नसल्यामुळे त्यांना कोणत्याच कंपन्यांचे क्रेडिट कार्ड मिळत नाही. मात्र यासाठी सुद्धा एक पर्याय आहे.

Low Cibil Score Step Up Credit Card
Low Cibil Score Step Up Credit Card

FD हा पर्याय Low Cibil Score असणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर आणि उपयोगी असा आहे. त्यामुळे त्यां व्यक्तिना Credit Card मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही. FD मध्ये जमा केले पैशांवर हमी परतावा तर मिळतोच शिवाय तुम्हाला तुम्ही केलेल्या FD वर क्रेडिट कार्ड सुद्धा मिळते. क्रेडिट कार्ड वापरल्यावर त्याचे पेमेंट नियमित केल्यावर त्या व्यक्तचा सिबिल स्कोर वाढवण्यास मदत सुद्धा होते.

वेगवेगळ्या बँकांत सुरक्षित क्रेडिट कार्ड घेण्यासाठी FD ठेवण्याची आवश्यक असलेली रक्कम वेगवेगळी असते. आज आम्ही तुम्हाला Credit Card विषयी एक असा पर्याय सांगणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल, तुम्ही मात्र 2 हजार रुपयांच्या एफडीचा फायदा घेऊन स्टेपअप क्रेडिट कार्ड (Low Cibil Score Step Up Credit Card) घेऊ शकतात.

Low Cibil Score Step Up Credit Card हे एसबीएम बँक लि. द्वारा ऑफर करण्यात आलेल्या एक सुरक्षित क्रेडिट कार्ड पैकी एक आहे. यात पैसाबाजार या प्रसिद्ध कंपनीची भागीदारी असुन हे कार्ड SBM बँकेत उघडलेल्या एफडीवर घेता येते. तसेच क्रेडिट कार्डच्या युजरला त्यांनी ठेवलेल्या एफडीवर वार्षिक 6.50% दराने व्याज सुद्धा मिळते.

How to make a credit card without CIBIL score

जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही कर्ज घेतले नसेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल. आणि तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तेव्हाच बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देते. त्यामुळे तुम्हाला CIBIL स्कोअर नसतानाही क्रेडिट कार्ड मिळेल, ज्यासाठी तुम्हाला बँकेत मुदत ठेव (FD) करावी लागेल.

फिक्स्ड डिपोस्ट (FD) सोप्या भाषेत – तुम्हाला बँकेत काही रुपये जमा करावे लागतील ज्याच्या बदल्यात बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देते. क्रेडिट कार्ड मिळवण्याचा हा पहिला मार्ग आहे.

Low Cibil Score Step Up Credit Card ची वैशिष्ट्ये

  • कार्ड प्रकार- सुरक्षित
  • जारीकर्ता- एसबीएम बँक (इंडिया) लिमिटेड
  • सामील होण्याचे शुल्क – शून्य (₹2,000 च्या FD साठी ₹200)
  • नूतनीकरण शुल्क- शून्य
  • व्याजमुक्त कालावधी – 20 ते 50 दिवस
  • क्रेडिट मर्यादा – मुदत ठेवीच्या 90 टक्के
  • रिवॉर्ड पॉइंट – प्रत्येक 100 रुपये खर्चासाठी 1 रिवॉर्ड पॉइंट (1 रिवॉर्ड पॉइंट = 25 पैसे)
  • FD वर व्याज दर – 6.50 टक्के

जर तुम्हाला तुमचे पहिले क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर प्रथम तुम्हाला फिक्स्ड डिपोस्ट करावे लागेल. तरच तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल. मुदत ठेवीचा साधा अर्थ असा आहे की तुम्ही ठराविक वेळेसाठी बँकेत पैसे जमा करता, त्या बदल्यात बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देते.

तुम्हाला क्रेडिट कार्ड घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बिल वेळेवर भरा, अन्यथा तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होईल ज्यामुळे तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!