PM vishwakarma loan up to 3 lakh: कोणत्याही हमीशिवाय मिळेल ३ लाखांपर्यंतचे कर्ज; जाणून घ्या सरकारची विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

PM vishwakarma loan up to 3 lakh : जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि पैश्यांची कमतरता भासत असेल तर काळजी करू नका, कारण मोदी सरकार स्वतः तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत मोदी सरकार गरजू लोकांना 3 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विश्वकर्मा योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जासाठी तुम्हाला कोणतीही हमी किंवा तारण ठेवण्याची गरज नाही. या विश्वकर्मा योजनेअंतर्गत काही नियम बनवलेले आहे..

PM vishwakarma loan
PM vishwakarma loan up to 3 lakh

विश्वकर्मा योजनेअंतर्गत (PM vishwakarma loan up to 3 lakh) हमी मिळण्यासाठी, तुम्ही या योजनेत प्रविष्ट कटण्यात आलेल्या 18 व्यापारांपैकी कुठल्याही एका व्यवसायाशी संबंधित असणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घ्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया…

अशा प्रकारे मिळणार 3 लाखांचे कर्ज PM vishwakarma loan up to 3 lakh

कोणताही कुशल कामगार व्यक्ती पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. विश्वकर्मा योजनेअंतर्गत मोदी सरकारने 3 लाख रुपयांपर्यंतच्या (PM vishwakarma loan up to 3 lakh) कर्जाची तरतूद केली असून ही रक्कम दोन टप्प्यांमध्ये देण्यात येते. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत, स्वतचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपयांचे, तर व्यवसाय सुरू केल्यावर व्यवसायाच्या विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभार्थी व्यक्तीला 2 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते. आणि त्या कर्जासाठी अर्जदाराला कोणतीही हमी द्यावी लागतनाही, शिवाय विश्वकर्मा योजनेअंतर्गत अत्यंत सवलतीच्या म्हणजेच वार्षिक 5 टक्के व्याजदराने हे कर्ज मिळेल.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत 3 लाख रुपये मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

कौशल्य प्रशिक्षण

मोदी सरकारची ही विशेष आणि महत्त्वकांक्षी योजना मागील वर्षी म्हणजेच 2023 सालच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेत कुशल व्यक्तींना आर्थिक मदत देऊन त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहित करणे हा एकमेव उद्देश आहे. या योजनेमध्ये फक्त कर्जच नाही तर इतर देखील अनेक फायदे मिळतात, ज्यात वेगवेगळ्या व्यवसायांशी संबंधित असेलल्या लोकांना त्या क्षेत्रामध्ये व्यवसाय स्थापन करण्याकरिता कौशल्य प्रशिक्षणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली असून प्रशिक्षणा-दरम्यान स्टायपेंडची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. विश्वकर्मा योजनेत व्यवसाय सुरू करण्याकरिता 3 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते, तर दुसरीकडे पात्र ठरलेल्या 18 व्यवसायामधील कामगारांचे कौशल्यात वाढ होण्यासाठी जवळपास एका आठवड्याचे प्रशिक्षण देखील देण्यात येते. आणि यासोबतच त्या व्यक्तींना दररोज 500 रुपये स्टायपेंड म्हणून सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे.

या 18 व्यावसायिकांनाच मिळेल कर्ज

पीएम विश्वकर्मा योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या व्यवसायांबद्दमध्ये गवंडी/माशांचे जाळे बनवणारे/सुतार/लोहार/सोनार/शिल्पकार/टूल किट बनवणारे/बोट बनवणारे/कुलूप/कुंभारकाम करणारे/दगड फोडणारेpमोची/जूता बांधणारे /झाडू बनवणारे, बाहुली आणि इतर खेळणी बनवणारे (पारंपारिक), जसे की, नाई/माला बनवणारे/धोबी/शिंपी कारागीर यांचा समावेश केलेला आहे.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत 3 लाख रुपये मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

PM vishwakarma loan up to 3 lakh कर्ज मिळवण्यासाठीची पात्रता

  • लाभार्थी अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
  • लाभार्थी व्यक्ती हा वरील 18 व्यापारांपैकी एक करणारा असावा.
  • अर्जदार करणाऱ्या व्यक्तीचे वय हे 18 ते 50 वर्षा दरम्यान असावे.
  • त्या व्यक्तीकडे मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित व्यवसायाचे प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती या योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या 140 जातींपैकी एका जातीचा असणे आवश्यक आहे.

PM vishwakarma loan up to 3 lakh साठी आवश्यक कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • बँक पासबुक
  • वैध मोबाईल नंबर

विश्वकर्मा योजनेअंतर्गत 3 लाख रुपये मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

असा करा ऑनलाइन अर्ज

  • सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा.
  • मुख्य पेजवर तुम्हाला पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना दिसेल.
  • येथे असलेल्या Apply Online पर्याय लिंकवर क्लिक करा.
  • आता येथे तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.
  • यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे व्यवस्थित भरा.
  • भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • आता फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!