Suryoday Solar rooftop Scheme 2024 : प्रधानमंत्री सूर्यादय योजनेअंतर्गत तुमच्या घरावर मोफत बसवून मिळेल सोलर पॅनल: जाणून घ्या नोंदणीची प्रक्रिया आणि फायदे

Suryoday Solar rooftop Scheme:- अयोध्यातील भव्य राम मंदिरात भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यावर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारतवासीयांच्या घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यात येईल अशी मोठी घोषणा केली आहे.

Suryoday Solar rooftop Scheme

यासाठी केंद्र सरकारने भारतातील जवळपास एक कोटी घरांच्या छतावर रूफटॉप सोलर (Solar rooftop) बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याकरिता प्रधानमंत्री मोदी सूर्योदय योजना (Suryoday Solar rooftop Scheme) सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एक कोटी नागरिकांच्या घरांच्या छतावर बसवणार सोलर रूफटॉप (Suryoday Solar rooftop Scheme)

अयोध्यातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवाशीयांच्या हिताचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला व तो म्हणजे देशातील एक कोटी नागरिकांच्या घरांच्या छतावर रुफटॉप सोलर बसवण्याचा बाबतीत मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार,

विश्वभरातील समस्त भक्तांना भगवान सूर्यवंशी प्रभी श्रीरामांच्या प्रकाशातून सातत्याने ऊर्जा मिळत असते. आज अयोध्यातील कार्यक्रम प्रसंगी एक कोटी भारतीयांच्या घराच्या छतावर स्वतःची सौर रूफटॉप यंत्रणा (Suryoday Solar rooftop Scheme) असावी हा माझा संकल्प अधिकच दृढ झालेला आहे. आयोध्याहून परतल्यावर मी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे आमचे सरकार भारतातील जवळपास एक कोटी नागरिकांच्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा बसवण्याचे लक्ष घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना Suryoday Solar rooftop Scheme सुरू करणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांचे विज बिल तर कमी होण्यास मदत तर होईलच मात्र, ऊर्जा क्षेत्रात सुद्धा भारत स्वावलंबी होण्यास मदत होईल.

असे राहिल Suryoday Solar rooftop Scheme चे स्वरूप?

Suryoday Solar rooftop Scheme ही केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत विजेच्या वाढत्या किमतींपासून देशातील गरीब जनतेला मुक्त करण्यात मदत होणार आहे. सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून दुर्बल घटकामधील नागरिकांच्या घरांच्या छतावर रूप टॉप सोलर म्हणजे Suryoday Solar rooftop बसवणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या महागाईपासून नक्कीच दिलासा मिळेल.

Suryoday Solar rooftop Scheme साठीची पात्रता?

प्राप्त माहितीनुसार, सरकारच्या प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 चा लाभ हा देशातील फक्त त्याच नागरिकांना मिळणार आहे ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असेल. म्हणजेच देशातील गरिब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा कराल?

जर तुम्हाला सुद्धा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री Suryoday Solar rooftop Scheme 2024 अंतर्गत तुमच्या घराच्या छतावर रूप टॉप सोलर बसायचे असल्यास तुम्हाला नॅशनल पोर्टल फॉर रूफटॉप सोलरच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी केल्यावर तुम्हाला या वेबसाईटच्या रूफ टॉप सोलर पर्यायावर क्लिक करावे लागेल व त्यानंतर लॉगिन करणे आवश्यक राहील. यानंतर तुम्हाला याकरिता अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

Similar Posts