Solar Pump Yojana 2024 |सरकारची Best सोलर पंप योजना, शेतकऱ्यांना मिळतेय 95% अनुदान; असा करा ऑनलाइन अर्ज..

Solar Pump Yojana 2024: शेतात लाईट नसले की, शेतकऱ्यांचा खूप तोटा होतो. पिकांना पाणी देण्याकरिता खूप मोठी अडचण उभी राहते. वीज नसल्यामुळे सगळ्याच गोष्टी खोळंबून जातात. पण आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. या लेखाद्वारे तुम्हाला अशा एका योजनेची माहिती देणार आहोत ज्यामुळे शेतकरी बंधुना विजेच्या झंझटीतून कायमची मुक्ती मिळणार आहे.

Solar Pump Yojana

‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत येणारी एक योजना जिचे नाव प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकरी सौर कृषी पंपांसाठी (solar pump online application) ऑनलाइन अर्ज करू शकता. महाऊर्जाच्या मध्यमतून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे की, solar pump साठी online application करावेत.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) द्वारे अर्जदारांचे online application मागवले असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर सौरपंप (solar pump with solar panel) चे वितरण करण्यात येणार आहे. सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना महाऊर्जाच्या वेबसाइटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. (Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024 Online Apply)

शेतकऱ्यांसाठी सोलर कृषीपंपाच्या क्षमतेत अट आहे कि, शेतकरी फक्त तेवढ्याच क्षमतेचा सोलर कृषीपंप घेऊ शकतो. ज्यात शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषी पंपांकरिता अर्ज करता येतील.

Solar Pump Yojana एवढे अनुदान मिळणार..

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप (solar pump with solar panel) योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गामधील शेतकऱ्यांना 90 % व अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 % अनुदानावर सौर कृषीपंप देण्यात येतील.

Solar Pump Yojana योजनेची पात्रता

  1. अर्जदार हा शेतकरी असणं अत्यंत आवश्यक आहे.
  2. अर्जदाराकडे त्याचा आधार कार्ड असणं गरजेचं आहे. (Solar Pump Yojana Eligibility)
  3. अर्ज करण्याकरिता बॅंक खाते क्रमांक असणं आवश्यक आहे.

असा करा अर्ज..

  • सर्वप्रथम महाऊर्जाच्या https://www.mahaurja.com/meda/en या वेबसाईटवर जा.
  • येथे तुम्हाला “आपली नोंदणी” पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल, त्या अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थित भरा.
  • सर्वात शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करून अर्ज दाखल करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!