Free Flour Mill Yojana 2024 : महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी; जाणून घ्या संपूर्ण माहिती..

Free Flour Mill Yojana Maharashtra: देशभरातील प्रत्येक नागरिकांसाठी सरकारने आतापर्यंत विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. या योजनांचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे. भारत सरकारने जास्तीत जास्त नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून केला आहे.

Free Flour Mill Yojanai

या योजनांचा लाभ घेऊन अनेक नागरिक स्वावलंबी व सक्षम झाले आहेत आणि स्वतःच्या तसेच स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक दृष्ट्या चांगल्या प्रकारे नियोजन करत आहे. तसेच अनेकांनी स्वतः सोबतच इतरांसाठी सुद्धा योजनांच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे. देशाची अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यामागे सरकारच्या या योजनांचा सुद्धा तितकाच हात आहे. यामध्ये आता खास महिलांसाठी सरकारने मोफत पिठाची गिरणी योजना राबवले आहे. या योजनेअंतर्गत ज्या कोणी पात्र महिला असतील त्यांना मोफत पिठाची गिरण दिली जाते.

महिलांनो मोफत शिलाई मशीन योजणेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा

मोफत पिठाची गिरण योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र असतील? या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय? तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी लागेल? आणि योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय असेल? (Free Flour Mill Yojana Subsidy) अशी तपशीलवार माहिती आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या सर्व मैत्रिणी पर्यंत शेअर करा.

Free Flour Mill Yojana योजनेचे प्रमुख उद्दिष्ट

1) मोफत पिठाची गिरणी योजना राबावण्यामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे, जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि या माध्यमातून महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवणे.

2) कुटुंबप्रमुख महिला असेल तर अशावेळी त्या महिलेस तिच्या कुटुंबाचे व्यवस्थित रित्या नियोजन करता आले पाहिजे आणि आर्थिक दृष्ट्या चांगला हातभार लागला पाहिजे या अनुषंगाने ही योजना राबवली आहे.

3) ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये कोठेही बाहेर न धावपळ करता घरबसल्या व्यवस्थित रित्या महिलांना काम करता यावे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनता यावे यासाठी सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली आहे.

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

मोफत पीठ गिरण योजनेसाठी अर्ज सादर करत असताना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यामध्ये अर्जदार महिला बारावी शिकलेली असल्याचा पुरावा, महिलेच्या आधार कार्ड चे झेरॉक्स, घराचा ८ अ खाते उतारा, उत्पन्नाचा दाखला (Atta Chakki Machine Scheme), तसेच लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त एक लाख वीस हजार रुपये इतके असल्याचा पुरावा, बँक पासबुकची झेरॉक्स, लाईट बिल झेरॉक्स इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे अर्ज सादर करत असताना लागतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी या महिला पात्र असतील (Eligibility for Free Flour Mill yojana);

  • मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ फक्त आणि फक्त महिलांनाच घेता येणार आहे. महिलांना स्वावलंबी तसेच सक्षम बनवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून ही योजना राबवली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येईल.
  • या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महिलांचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 60 वर्षे च्या दरम्यान असावे. या वयोगटातील महिलांना योजनेसाठी अर्ज सादर करता येईल.
  • अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत असावे. त्यापेक्षा अधिक असेल तर लाभ घेता येणार नाही.
  • ग्रामीण तसेच शहरी भागामधील महिलांना मोफत पिठाची गिरण योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा (apply for free flour Mill scheme)

Free Flour Mill Yojana

1) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये भेट द्यायचे आहे किंवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊन महिला समाज कल्याण विभाग येथील अधिकाऱ्यांना भेट द्यावी लागेल.

2) या योजनेबाबत आवश्यक माहिती व्यवस्थित रित्या विचारून घ्यायची आहे (PM Free Atta Chakki Machine Yojana). तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे का ही माहिती घ्यायची आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनांना प्रमाणे अचूक पद्धतीने ऑफलाइन अर्ज सादर करायचा आहे.

3) या योजनेचा लाभ घेत असताना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी लेखाच्या सर्वात खाली लिंक दिलेली आहे तिथून अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायचे आहे.

4) अर्जामध्ये जी काही माहिती विचारलेली आहे ती व्यवस्थित भरावी. अर्ज भरत असताना तुम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती येथे जाऊन व्यवस्थित रित्या अर्ज भरू शकता आणि अर्ज सबमिट करू शकता.

5) महत्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांमध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. याची पूर्णपणे खात्री मास्टर नोंदवहीच्या माध्यमातून पूर्ण करा आणि मगच अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!