खिश्यात पैसे नसले तरीही मिळणार बसचे तिकीट..! कसं ते जाणून घ्या…

ST bus ticket will be issued through UPI & PhonePay, GPay : एस. टी. बसने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. आता एस. टी. बसचे तिकीट घेण्यासाठी तुमच्या खिश्यात रोकड आहे (Cash) नसली तरी तुम्हाला धावपळ करण्याची आवश्यकता नाही. कारण तुमच्या खिश्यात रोख पैसे (Cash) नसली तरीही तुम्हाला एस. टी. बसचे तिकीट मिळणार आहे. कसं ते जाणून घ्या…

बसचे तिकीट काढण्याकरीता ऐनवेळेस रोकड (Cash) नसल्यावर प्रवाशांना होणार त्रास लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाने तब्बल 5 हजार नव्या स्वाईप मशिनची (Swipe machine) खरेदी केली असून प्रवाशांना आता फोन पे (PhonePay), गुगल पे (GooglePay), पेटीएम (Paytm) आदी ‘UPI’द्वारे तिकीट घेता येणार आहे. या बरोबरच तुमच्याकडे डेबिट कार्ड (Debit card) व क्रेडिट कार्डचा (Credit card) पर्याय सुद्धा उपलब्ध असणार आहे. म्हणजेच प्रवाशांच्या खिश्यात रोख रक्कम (cash) नसली तरीही तिकीट मिळणार आहे.

जुलै पर्यंत काम पूर्ण होणार :

राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या माहितीप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये सात एस. टी विभागांना नवीन स्वाईप मशिन देण्यात आलेले आहे, तर उर्वरित विभागांत जुलै महिन्यामध्ये नवीन स्वाईप मशिन देण्यात येणार आहे.

दरम्यान, पूर्वीच्या तुलनेत ही प्रणाली अद्ययावत झाली असून आता नवीन स्वाईप मशिनमध्ये ‘युपीआय’ची (UPI) व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना खिश्यात रोकड (cash) न बाळगता फोन पे (PhonePay), गुगल पे (GooglePay), पेटीएम (Paytm) किंवा डेबिटकार्ड (Debit card) व क्रेडिटकार्डद्वारे (Credit card) सुध्दा तिकीट काढता येणे शक्य होणार आहे.

काही महिन्यापूर्वीच एस टी. प्रशासनाने ‘स्वाइप मशिन’द्वारे (Swipe mashin) बसचे तिकीटे देण्याची पद्धत सुरू केली होती. मात्र, त्यावेळी फक्त डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारेच तिकीटे देण्यात येत होती. त्यात सुद्धा अनेक वेळेस अडचण येत होती. ही बाब लक्षात घेऊनच एस. टी प्रशासनाने नव्या प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहे.

एसटीच्या नव्या प्रणालीबाबत थोडक्यात.!

▪️एस.टी. प्रशासनाने पहिल्या टप्प्यामध्ये सात विभागांत सेवा दिली जाणार असून त्यामध्ये बुलडाणा, लातूर, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर व भंडारा विभागांचा समावेश आहे.
▪️राज्यामधील उर्वरित विभागांमध्ये जुलैपासून नवीन स्वाइप मशीन उपलब्ध होणार आहे.
▪️वाहकांना ‘युपीआय’बाबत विशेष प्रशिक्षण दिले जाणार.
▪️नवीन स्वाइप मशिनमध्ये ‘क्यूआर’ (QR) कोडचा समावेश असून त्याला स्कॅन केल्यावर प्रवाशांना तिकीट मिळणार.

याबाबत बोलतांना एस.टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री सुहास जाधव म्हणाले की, ‘प्रवाशांच्या सोयीकरीता हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहकांना प्रशिक्षण दिले जात आहे. लवकरच प्रवाशांना UPI द्वारे तिकीट मिळण्यास सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!