मनमाड-अंकाई किल्ला या दरम्यान दुहेरीकरणासाठी १५ रेल्वे रद्द..!

भुसावळ विभागातील मनमाड-अंकाई किल्ला या रेल्वे स्थानकादरम्यान यार्ड रिमोल्डिंग आणि दुहेरीकरण करण्याकरिता रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम २३ जून पासून चालू झाले असून ३० जूनपर्यंत चालणार आहे.

या कामासाठी आठ दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला असून त्यामुळे जवळपास २८ रेल्वे रद्द करण्यात आल्या तर, काही गाड्या उशिरा धावणार आहेत. याचा सर्वात जास्त फटका पंढरपूर=निजामाबाद पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. साईनगर शिर्डी=काकिनाडा पोर्ट, सिकंदराबाद=साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, दौंड=निजामाबाद आदी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यामुळे आणि गर्दीचा सिझन नसल्याने रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत. मात्र ज्या प्रवाशांनी दोन-तीन महिने आधीच तिकीट आरक्षित करून ठेवले आहे त्यांना याचा फटका बसणार आहे.

रद्द झालेल्या पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्या

▪️काकिनाडा पोर्ट-साईनगर शिर्डी,
▪️साईनगर शिर्डी-काकिनाडा पोर्ट,
▪️सिकंदराबाद-साईनगर शिर्डी,
▪️साईनगर शिर्डी- सिकंदराबाद,
▪️दौंड- निजामाबाद पॅसेंजर,
▪️निजामाबाद- दौंड पॅसेंजर,
▪️विशाखापट्टणम- साईनगर शिर्डी, (२३ जून )
▪️साईनगर शिर्डी – विशाखापट्टणम, (२४ जून )
▪️साईनगर शिर्डी- कालका,
▪️कालका- साईनगर शिर्डी,

▪️अंजनी- पुणे,
▪️पुणे- अंजनी,
▪️दादर- साईनगर शिर्डी,
▪️साईनगर शिर्डी- दादर,
▪️हडपसर- नांदेड,
▪️नांदेड- हडपसर,
▪️पुणे- दरभंगा,
▪️दरभंगा- पुणे,
▪️नागपूर- पुणे,
▪️पुणे- नागपूर,
▪️जसीडीह- पुणे,
▪️पुणे- जसीडीह,
▪️काझीपेठ- पुणे,
▪️पुणे-काझीपेठ,
▪️निजामाबाद- पंढरपूर,
▪️पंढरपूर- निजामाबाद पॅसेंजर,

▪️२५ ते २८ जूनदरम्यान सी.एस.टी. मुंबई – जालना जनशताब्दी एक्स्प्रेस.
▪️२६ ते २९ जूनदरम्यान जालना – सी.एस.टी. मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस.
▪️२७ व २८ जून रोजी सी.एस.टी. मुंबई – आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस.
▪️२६ व २७ जून रोजी आदिलाबाद – सी.एस.टी. मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस.
▪️२७ व २८ जून रोजी जालना – श्री साईनगर शिर्डी रेल्वे
▪️२७ व २८ जून रोजी श्री साईनगर शिर्डी – जालना रेल्वे.
▪️२४ व २६ जून रोजी जालना – नगरसोल रेल्वे.
▪️२४ व २६ जून रोजी नगरसोल – जालना रेल्वे.

उशिरा धावणाऱ्या रेल्वे गाड्या

▪️सिकंदराबाद-साईनगर शिर्डी ५० मिनिटे,
▪️काकिनाडा- साईनगर शिर्डी १५ मिनिटे,
▪️विजयवाडा- साईनगर शिर्डी ५० मिनिटे,
▪️जम्मूतावी- पुणे १ तास ५५ मिनिटे,
▪️काकिनाडा-साईनगर शिर्डी एक तास १५ मिनिटे,
▪️वास्को-द-गामा-हजरत निजामुद्दीन १० मिनिटे,
▪️जम्मूतावी- पुणे ४० मिनिटे,

▪️जम्मूतावी- पुणे २ तास २० मिनिटे,
▪️वास्को-द-गामा-हजरत निजामुद्दीन १ तास २५ मिनिटे,
▪️हजरत निजामुद्दीन- वास्को-द-गामा ४० मिनिटे,
▪️सीएसएमटी- नांदेड ४५ मिनिटे,
▪️जम्मूतावी- पुणे १ तास ५० मिनिटे,
▪️वास्को-द-गामा-हजरत निजामुद्दीन ५५ मिनिटे उशिरा धावणार आहे याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!