एसटी बसचा मोफत प्रवास या नागरिकांना देखील मिळणार | Senior Citizen ST Concession Scheme

Senior Citizen ST Concession
Senior Citizen ST Concession

Senior Citizen ST Concession Scheme: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपली लालपरी चालविणारी.. आपली एसटी चांगलीच लोकप्रिय झाली आहे. कुठेही गावाला जायचे असेल तर अगदी स्वस्तात कुठेही नेणारी ही एसटी बस.. आज एसटी मध्ये लाखों नागरिक प्रवास करत आहेत.

कोरोना काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला चांगलाच झटका बसला होता. कोरोना काळानंतर, एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप स्वतःच्या हितासाठी पुकारला होता. हा संप 6 महिने चालला, तरी देखील एसटी एवढ्या संकटातून बाहेर येऊन पुन्हा चांगल्या रूळावर आली आहे.

एसटी अनेक संकटावर मात करून जनतेसाठी विविध सुविधा देते. एसटी प्रवाशांना तिकीट दरात 50 ते 100 टक्क्यांपर्यंत सवलत देते. ही जी सवलत असते ही राज्य सरकारकडून दिल्या जाते. सामान्य नागरिकांना परवडणारी अशी ही एसटी आहे. (msrtc smart card senior citizen)

एसटीमध्ये 65 ते 75 वर्षे वयोगटातील नागरिकांना उपक्रमाद्वारे चालवल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या बस सेवांवर तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत दिल्या जाते. त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यांसारखी ओळखपत्रे दाखवून एसटी बसचा मोफत प्रवास सुविधेचा लाभ घेता येतो.

एसटी बस प्रवास मध्ये नागरिकांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. 65 ते 75 वयोगटातील नागरिकांना एसटीच्या तिकिट दरांत 50 टक्के सवलत देण्यात येते. मात्र, आता नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास दिल्या जाणार आहे. (msrtc smart card online apply)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त घोषणा केली आहे. या घोषणेमध्ये राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीकडून मोफत प्रवास दिल्या जाणार आहे. देशातील अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील सुमारे दीड लाख ज्येष्ठ 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ मिळत आहे.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!