Government Job : 10वी पाससाठी शिपाई भरती; संभाजीनगर (औरंगाबाद)सह या विभागात 125 पदे रिक्त…

Government Job: महाराष्ट्र शासनतर्फे नगररचना व मूल्यनिर्धारण विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, अमरावती विभागात ‘शिपाई’ (गट-ड) संवर्गातील 125 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र शासनाच्या नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग
पदाचे नाव – शिपाई
एकूण पद संख्या – 125 पदे
अर्ज करण्याची पद्धत – Online
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 20 सप्टेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, अमरावती (Government Job)

अर्ज शुल्क –

  • अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 900/-

शैक्षणिक पात्रता – (Government Job)
इच्छुक उमेदवार हा 10 वी पास असणे गरजेचे आहे.

पगार
Rs. 15,000/- रू. ते 47,600/- रू.

वयोमर्यादा –

  • किमान 18 वर्षे
  • कमाल 40 वर्षे
    • मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.)
    • दिव्यांग उमेदवारांकरिता अधिकतम वयोमर्यादा ४५ वर्षे तर पूर्वीपासून शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांची वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.
    • मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादा शिथिलतेची सवलत यांपैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.

असा करावा लागणार आहे अर्ज –(Government Job)
➢ या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करायचा आहे.
➢ उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज सादर करावे.
➢ अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रतेच्या अटींबाबत संपूर्ण माहिती द्यावी नसता अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
➢ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!