शेवगांव शहरात वे.श्या व्यवसाय जोमात..

जगात कुठेही मी शिवाजीनगर मध्ये राहतो हे अभिमानाने आणि गर्वाने सांगतात, पण हेच अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या शहरात सांगताना शहरवासियांची मन लज्जेने खाली जाते. त्याचे कारण म्हणजे शेवगांव शहरातील मध्यभागी असलेल्या “शिवाजीनगर” या भागात गेल्या चाळीस वर्षांपासुन देह विक्रीचा अवैध व्यवसाय.

शिवाजीनगर या भागातील अड्डा मालकीण करत असलेले अत्याचार, या भागातील सावकार करत असलेली आर्थिक पिळवणुक शारीरिक आर्थिक शोषण आणि मानसिक त्रास याला कंटाळुन होणाऱ्या आत्महत्या, पळून जाणे, पैसे घेऊन पसार होणे, नेहमी येणाऱ्या गिऱ्हाईका बरोबर पळुन जाणे, आदी अवैध प्रकार वरचेवर घडत असतात.

तसेच या भागातील काही महिला पर पुरुषांना नादी लावून त्यांना लाखो रुपयांना गंडा घालण्याचे काम करत आहेत. यामुळे अनेक तरुण बरबाद झाले आहेत, तर काहींचे संसार मोडले आहेत, वरून खोटे नाटे गुन्हे दाखल करून भरडलेल्या तरुणांना समाजात बदनाम कारण्याचे उद्योग या भागातील काही महिला करत आहेत. तर काही महिला गुंड आणि राजकारणी यांना हाताखाली धरून सर्वसामान्य नागरिकांचे शोषण करत आहेत.

तसेच या शिवाजीनगर जवळ असलेल्या नेहरूनगर ईदगाह मैदान आणि प्रोफेसर कॉलनी या भागातील शाळकरी मुलं तरुण महिला आणि वृद्ध नागरिकांना याचं भागातुन जावे यावे लागते. त्यांची छेड काढणे, अश्लील इशारे करणे, पाकीट मारणे, दमबाजी करणे आदी प्रकार वरचेवर घडत असतात. तसेच कित्येक प्रतिष्ठित नागरिकांच्या जागा आणि व्यवसाय या भागात आहेत, परंतु या भागातील महिलांच्या दहशतीमुळे आणि गुंड यांच्या वावरामुळे या भागातील नागरिक आपला जीव मुठीत धरून जगत आहेत.

या विरोधात मा. जिल्हाधिकारी अहमदनगर पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रांत साहेब, शेवगांव पाथर्डी पोलीस उप विभागीय अधिकारी शेवगांव तहसीलदार शेवगांव यांचेकडे वारंवार तक्रारी दाखल केलेल्या असून या भागात नगरपरिषद शेवगांव मार्फत सि. सि. टी. व्ही. लावले जावेत जेणेकरून या भागातील सर्व अवैध धंदे इन कॅमेरा येतील हि शेवगांव शहराला लागलेली कीड कायमची नष्ट व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

महिला दिनानिमित्त या परिसराचे मान्यवरांच्या उपस्थितीत “शिवाजीनगर” भागाचे “शांतीनगर” नामांतर करणार.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील शिवाजीनगर या पवित्र नावाने वसलेल्या भागात मागील कित्येक वर्षापासून देह विक्रीचा व्यवसाय जोमात सुरु असल्याने नागरिकांच्या भावना त्रीव्र झाल्या असून, लवकरच या भागाचे नामांतरण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भराट तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी सांगितले आहे.

शेवगांव शहरातील शिवाजीनगर या रेडलाईट एरियाचे नामांतर शांतीनगर “आधी पुनर्वसन मग विस्थापन” यावर मान्यवरांचे स्नेहालय कार्यलयात मार्गदर्शन आयोजन करण्यात आले असून, शहरातील लॉज आणि हॉटेलचा अवैध वापर या कामासाठी होणं, या सर्व प्रकारांना शासकीय यंत्रणा हाताशी धरून, महसुल प्रशासन नगरपरिषद आरोग्य विभाग पंचायत समिती आणि पोलीस प्रशासन यांचे योग्य तें मार्गदर्शन घेऊन, टप्या-टप्या ने प्रबोधन करणे या संदर्भात वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांकडून मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. असे आवाहन शेवगांव तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री प्रशांत भराट यांनी केले आहे.

शेवगांव शहराची भळभळती जखम म्हणजे महिलांचे शारीरिक शोषण गेल्या कित्येक पिढ्या सुरु असलेला अवैध वे श्या व्यवसाय आणि त्यातून निर्माण होणारे भीषण प्रश्न, अ नै ति क संबंधातून निर्माण झालेले अपत्य त्याचे पालन पोषण शिक्षण त्या शोषित महिलांचे आर्थिक प्रश्न सामाजिक स्थान होणारी आर्थिक पिळवणुक, व्यसनाधीनता निर्माण होणारे भीषण वास्तव, या अवैध व्यवसायातुन परावृत्त होऊन सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणे, यासाठी जागतिक महिला दिनाचे निमित्त साधुन या भागाचे नामांतर आणि शोषित महिलांचे प्रबोधन असे कार्यक्रम, शहरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध राजकीय पक्ष मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मंगळवारी 08 मार्च रोजी रंजलेल्या गांजलेल्या व कायम उपेक्षित राहिलेल्या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपला एक खारीचा वाटा असावा असे वाटत असेल तर, सध्याचे शिवाजीनगर नियोजित { शांतीनगर } या नामकरण विधीसाठी स्नेहालय कार्यलाय शिवाजीनगर या ठिकाणी मंगळवार 08/03/2022 रोजी सकाळी 10:00 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन शेवगाव शहरातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि शिवप्रेमी संघटना यांनी केले आहे

{साभार: अविनाश देशमुख शेवगांव }

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!