दिलासादायक..! आज औरंगाबाद जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या आत..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी एकूण 471 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 1052 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू तर सात हजार 921 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 1052 जणांना (मनपा 742, ग्रामीण 310) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 52 हजार 862 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 471 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 64 हजार 464 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 681 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण सात हजार 921 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर रुग्ण संख्या (370)

कॅन्सर हॉस्पिटल 2, श्रीनिकेतन कॉलनी 1, नाथनगर 1, देवानगरी 1, शहागंज 1, शहानुरवाडी 2, गादिया विहार 1, बीड बायपास 8, केशवनगरी 2, उल्कानगरी 5, सातारा परिसर 7, एन -1 येथे 6, सहारा प्राईड 1, विश्वभारती कॉलनी 1, उराजा नगर 1, नंदीग्राम कॉलनी 1, संदेश नगर 2, सुतगिरणी 2, एन 2 येथे 9, जवाहर कॉलनी 1, ज्ञानेश्वर नगर 2, शिवाजी नगर 4, गारखेडा परिसर 3, आर्या नगर 1, श्रीनगर 1, ज्योती नगर 2, गजानन नगर 1, अहिरंत नगर 1, समर्थ सोसायटी 1, उस्मानपुरा 2, गजानन कॉलनी 2, शास्त्री नगर 1, कैलास नगर 1, उत्तरानगरी 2, एन 3 येथे 10, एन 4 येथे 3, जयभवानी नगर 1, टाऊन सेंटर 2, सहकार बँक कॉलनी 1, हर्सुल 4, सिडको 1, कमल नयन बजाज हॉस्पिटल 1, घाटी 1, मयुर पार्क 1, अन्य 266

ग्रामीण भाग रुग्ण संख्या (101)

औरंगाबाद 28, फुलंब्री 4, गंगापूर 5, कन्नड 15, खुलताबाद 4, सिल्लोड 20, वैजापूर 14, पैठण 10 सोयगाव 1

मृत्यू (01)

घाटी (01)

1. 18 महिने स्त्री, बाबा कुटी, पडेगाव, औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!