IRCTC देत आहे चारधामला भेट देण्याची संधी; 12 दिवसांची असेल यात्रा, राहणं-खाणं फक्त एवढ्या पैशांमध्ये होईल..

केदारनाथ धामची पवित्र यात्रा (केदारनाथ धाम 2022) सुरू झाली आहे. त्याचबरोबर बद्रीनाथ धामचे दरवाजे ८ मे पासून उघडले आहेत. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने चार धाम यात्रेसाठी खास टूर पॅकेज आणले आहे. ही यात्रा 10 जूनपासून सुरू होणार आहे.

जाणून घ्या पॅकेजचे तपशील:

पॅकेजचे नाव – चार-धाम यात्रा

डेस्टिनेशन -केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार, बरकोट, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, गुप्तकाशी, सोन प्रयाग, हरिद्वार, जानकीछट्टी

हॉटेल – डिलक्स

किती येईल खर्च ?

▪️या पॅकेजमध्ये जर तुम्हाला एकट्याने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला 77 हजार 600 रुपये खर्च करावे लागतील.
▪️जर तुम्ही दोन लोकांबरोबर प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 61 हजार 400 रुपये खर्च करावे लागतील.
▪️ तीन जण असल्यास प्रति व्यक्ती 58 हजार 900 रुपये खर्च करावे लागतील.

लहान मुलांसाठी लागेल इतका खर्च

5 ते 11 वर्षांच्या मुलांना या पॅकेज मध्ये प्रति मुलं 33 हजार 300 रुपये तिकीट ठेवण्यात आली असून बेड न घेतल्यास प्रति मुलं 27 हजार 700 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय 2 ते 4 वर्षांच्या मुलांकरीता 10 हजार 200 रुपये खर्च करावे लागतील.

कोणत्या मिळणार सुविधा

● या पॅकेज मध्ये तुम्हाला दोन्ही बाजूंनी फ्लाइटची सुविधा मिळेल.

● राहण्याची सुविधा डिलक्स हॉटेलमध्ये करण्यात येईल.

● ही यात्रा 11 दिवसांसाठी असेल.

● संपूर्ण यात्रेसाठी IRCTC टूर मॅनेजर उपलब्ध असेल.

● पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल.

● तसेच पार्किंग शुल्क आणि टोल टॅक्सचाही समावेश असणार आहे.

यात्रेकरूंना डिलक्स हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये 11 रात्री राहण्याची सोय केली जाईल. दिल्ली विमानतळावरून प्रवाशांना वातानुकूलित वाहनातून चारधाम येथे नेले जाईल. IRCTC सर्व ठिकाणांना भेट देण्यासाठी ट्रेन देईल. संपूर्ण दौऱ्यात प्रवाशांसाठी नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था मोफत केली जाईल. IRCTC टूर मॅनेजर संपूर्ण टूरमध्ये प्रवाशांसोबत असतील. प्रवाशांना पार्किंग शुल्क, टोल टॅक्स आणि इतर कोणताही खर्च भरावा लागणार नाही.

हा खर्च प्रवाशांनाच करावा लागणार आहे.

आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे की, या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांनी घोड्यावर स्वार झाल्यास किंवा पालखी किंवा हेलिकॉप्टरची सेवा घेतली तर त्याचा खर्च त्यांना स्वत:लाच करावा लागेल. याशिवाय लॉन्ड्री, टेलिफोनचा खर्च, मिनरल वॉटर, कोल्ड ड्रिंक्स यासाठी लागणारे पैसेही प्रवाशाला भरावे लागणार आहेत. जर प्रवाशांनी रॉक क्लाइंबिंग किंवा पॅराग्लायडिंग केले तर त्यासाठीही त्यांना स्वतःच्या खिशातून पैसे मोजावे लागतील. स्मारके, राष्ट्रीय उद्यान, प्राणीसंग्रहालय आणि बोट राइड इत्यादींचा खर्चही प्रवाशांना करावा लागेल.

या पॅकेज बद्दल अधिक माहितीकरिता तुम्ही 8287931660 आणि 9321901804 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

शिवाय तुम्ही https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=WMA59C या अधिकृत लिंकलाही भेट देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!