प्रेमिकेच्या पतीचे केले दोन तुकडे; अ.नै.ति.क संबंधातून क्रूरतेचा कळस, औरंगाबाद मधील धक्कादायक घटना..
औरंगाबाद जिल्ह्यामधील शफेपूर गावामध्ये थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे.
गावातील एका तरुणाने आपल्या एका मित्राच्या मदतीने प्रेयसीच्या पतीची निर्घृण हत्या करून त्याच्या शरीराचे कंबरेपासून दोन तुकडे केल्याची थरकाप उडवणारी घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन आरोपी नामे सुनील हरणकाळ आणि छोटू मोकशे यांना अटक यांना केली आहे.
तर संदीप मोकशे असं हत्या झालेल्या मृत व्यक्तीचं नाव आहे. दोन्ही आरोपी आणि मृत असे तिघेही औरंगाबाद जिल्ह्यातील शफेपूर गावातील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत संदीप मोकशे याच्या पत्नीचं गावातील एका व्यक्तीसोबत अ.नै.ति.क संबंध सुरू होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पत्नीच्या अ.नै.ति.क संबंधाची चाहूल संदीप मोकशे यांना लागल्यानंतर तिच्या प्रियकरा बरोबर जोरदार भांडण झालं.
झालेल्या भांडणानंतर पत्नीच्या प्रियकराने अ.नै ति.क संबंधात अडसर ठरणाऱ्या संदीपच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार आरोपीने गावातील एका मित्राच्या मदतीने संदीप मोकशे याची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी एवढ्यावरच न थांबता मृतदेहाचे दोन तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हत्येची ही थरारक घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतदेहाचा अवस्था पाहून पोलीस देखील हादरले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. या घटनेचा पुढील तपास औरंगाबाद ग्रामीण पोलीस करत आहेत.