औरंगाबादच्या तरुणींनी 16 हजार प्लास्टिकच्या बाटल्यांनी साकारले अनोखे घर.

प्लास्टिक आणि कचऱ्याचा योग्य रिसायकलिंग करून प्रदूषण नियंत्रित करता येऊ शकते, असे जाणकारांकडून अनेकदा सांगितले जाते. याचा पुरावा महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये समोर आला आहे, जिथे दोन मुलींनी तब्बल 16,000 बाटल्या आणि सुमारे 12 ते 13 टन प्लास्टिकचा कचरा गोळा केला आणि त्यातून इकोब्रिक्स बनवून झोपड्या बांधल्या. त्यासाठी त्यांनी चार महिन्यांपासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा केल्या.

कल्याणी भारंबे आणि नमिता कपाळे असे या तरुणींचे नाव असून त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कला विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. लॉकडाऊनच्या काळात औरंगाबादच्या रस्त्यावरून रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकचे रॅपर (नॉन बायोडिग्रेडेबल) गोळा करायला सुरुवात केली. या चार महिन्यांत त्यांनी शहरातील रस्त्यांवरून 16 हजार बाटल्या आणि 13 टन प्लास्टिक कचरा गोळा केला. त्यानंतर 7 ट्रॅक्टर माती, पेंढा आणि 16 हजार प्लास्टिकच्या बाटल्या वापरून 7 झोपड्या तयार करण्यात आल्या, ज्या औरंगाबाद शहरापासून जवळच असलेल्या दौलताबाद-शरणापुर फाटा रस्त्यावर या झोपड्या बांधण्यात आल्या आहे.

आधी दोन्ही तरुणींनी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यामध्ये प्लास्टिकचा कचरा भरून त्या सील केल्या. नंतर त्या बाटल्या गोळा करून भिंत बांधण्यात आली. या 20 बाय 20, 10 बाय 10 आणि 11 बाय 15 अशा तीन फूट भिंती उभारण्यात आल्या होत्या. एवढेच नाही तर 19 बाय 19, 34 बाय 9.5 फुटांपर्यंत भिंती असलेल्या झोपड्या बनवण्यात त्यांना यश आले. तीनही हंगामात त्यांनी या घरांची चाचणी घेतली आहे.

युट्युब वरून सुचली ही कल्पना..
आरो व्हिलेज सिटीच्या कल्याणी भारंबे आणि नमिता कपाळे या दोन्ही तरुणींनी लॉकडाऊनच्या काळात यूट्यूबवर टाकाऊ बाटल्या आणि कचऱ्यापासून विटांच्या भिंती बनवल्या जात असल्याचे पाहिले. ते व्हिडिओ पाहून असा प्रयोग आपल्या औरंगाबाद शहरात करता येईल, असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांनी गुगलवर माहिती गोळा केली आणि 3 महिने संशोधन केले. त्यानंतर चार महिन्यांत विविध भागातून 16 हजार बाटल्या आणि कचरा गोळा करून इको-ब्रिक बनवण्याचा प्रयोग यशस्वी झाला. या झोपड्यांना त्यांनी ‘प्रोजेक्ट वावर’ असे नाव दिले.

पाहा या अनोख्या घरांचे फोटो….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!