टायर फुटल्याने अनियंत्रित झाल्यामुळे कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात उंडणगाव येथील मधुकर ईश्वर धनवई ( वय 31 वर्षे) यांचा जागीच मृत्यू तर डॉ. जरांडिकर हे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दुपारी 3:30 वाजेच्या आसपास घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील डॉ. जरांडीकर आणि मधुकर ईश्वर धनवई हे दोघे जण डॉ. जरांडीकर यांच्या बलेनो कार क्रमांक MH 20 EE 3295 ने लग्नासाठी चोपडा येथे जात असताना अचानक कारचा टायर फुटल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार तीनदा पलटी होऊन रस्ता दुभाजकावर आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की कार चक्काचूर झाली आहे. या अपघातात मधुकर ईश्वर धनवई यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ.जरांडीकर हे गंभीर जखमी झाले. डॉ. जरांडीकर यांच्यावर चोपडा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.





