Add location to Google Maps: गुगल मॅपवर तुमच्या घराचे, ऑफिसचे किंवा दुकानाचे Location free मध्ये ॲड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Add Location to Google Maps: Google Maps च्या नेव्हिगेशन मुळे आपण अशा ठिकाणी सुद्धा सहजच पोहोचू शकतो जिथे यापूर्वी कधीही गेलो नव्हतो. आज बरेचजण गुगल मॅपवर त्यांच्या व्यवसायाचा, दुकानाचा किंवा घराचे Location टाकतात. तुम्हाला सुद्धा तुमच्या घराचे/दुकानाचे Location Google Maps वर दाखवायचे असेल, तर तुम्ही येथे नमूद केलेल्या पद्धतीचा अवलंब करू शकता.

Add location to Google Maps

Google maps हे जगभरातील लोक वापरत असलेले लोकप्रिय मॅपिंग ॲप आहे. Google maps फक्त ठिकाणांचे स्थान शोधण्यातच मदत करत नाही तर तेथे जाण्याचा मार्ग देखील अचूक पद्धतीने दर्शवितो. दररोज जगातले कोट्यवधी लोक Google mapsची नेव्हिगेशन सेवेचा वापर करतात. याशिवाय बऱ्याचश्या लोकांनी त्यांच्या दुकानाची/ऑफिसची किंवा त्यांच्या घराचे Location गुगल मॅपवर टाकतात. गुगल मॅपवर तुमच्या व्यवसायाचे location असेल तर ग्राहक त्या ठिकाणी सहज रोटा पोहोचू शकतात, यामुळे तुमचा व्यवसाय वाढण्यासही मदत होते. (Add location to Google Maps)

How to Add location to Google Maps

 • सर्वप्रथम Google maps चे ॲप उघडा.
 • नंतर Manage your Google Account वर क्लिक करा.
 • हे तुम्हाला तुमच्या Google खात्यावर घेऊन जाईल, आता Personal info या पर्यायाची निवड करा.
 • आता येथे तुम्हाला Addresses चा पर्याय मिळेल.
 • येथे तुम्हाला Home, Work आणि Other Addresses चा पर्याय मिळेल.
 • तुमच्या गरजेनुसार तुम्ही घर, ऑफिस, दुकान किंवा इतर ठिकाणचे location जोडू शकता.

Google maps वर व्यवसायाचे location कसे जोडायचे

Google maps वर व्यवसायाचे location जोडण्यासाठी, तुमच्याकडे Google Business प्रोफाइल असणे आवश्यक आहे. Google Maps वर व्यवसायाचे location कसे जोडायचा जाणून घ्या.

 • सर्वप्रथम Google maps ॲपवर जा.
 • मॅपवर खालील Contribute ya पर्यायाची निवड करा.
 • आता Add Place या पर्यायावर जा.
 • Is this your business?  वर टॅप करा.
 • हे तुम्हाला Chrome ब्राउझरवर घेऊन जाईल.
 • येथे तुम्हाला व्यवसायाशी संबंधित माहिती जसे की व्यवसायाचे नाव, व्यवसाय श्रेणी इ. प्रदान करावी लागेल.
 • नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. 
 • आता तुमच्या मोबाईलवर एक OTP प्राप्त होईल, तो प्रविष्ट करून सत्यापनची प्रक्रिया पूर्ण करा.
 • यानंतर, तुमच्या व्यवसायाचे Location सेट करा.
 • तुमच्या कामाच्या वेळा आणि वेबसाइट तपशील, असल्यास, प्रविष्ट करा.
 • यानंतर तुमच्या ऑफिसचे/ दुकानाचे फोटो अपलोड करा.
 • यानंतर व्यवसाय Location जोडण्याची विनंती सबमिट करा.

तुमचे तपशील वेरिफाय केल्यावर तुमच्या व्यवसाययाचे location Google नकाशे वर दिसेल. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही गुगल मॅपमध्ये तुमचे location सहजरित्या जोडून तुमच्या व्यवस्याला एक विशिष्ठ उंचीवर नेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!