Find My Kids location tracker: आता या GPS चाइल्ड ट्रॅकिंग ॲपसह मुलांवर लक्ष ठेवणं होणार सोपं! जाणून घ्या सविस्तर!

Find My Kids location tracker app: मित्रांनो सध्या गुगल प्ले स्टोअरवर दररोज काही ना काही नवनवीन अँड्रॉइड ॲप्स येतच राहतात. यामध्ये अनेक प्रकारच्या ॲप्सचा समावेश होतो, जसे की काही ॲप्स अभ्यासाशी संबंधित असतात तर काही सोशल मीडिया शी संबंधित असतात.

Find My Kids location tracker
Find My Kids location tracker

गेल्या दहा-पंधरा वर्षांमधे तंत्रज्ञानाने प्रगतीचा फार मोठा पल्ला गाठला आहे. काही वर्षांपूर्वी पालकांना त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी सतत त्यांच्या मागे राहावे लागायचे, ते कुठे जातात, कोणाशी बोलतात या सगळ्या गोष्टींवर त्यांना लक्ष ठेवावे लागत होते. मात्र आता असे काही ॲप्स आले आहेत जे तुमच्या मुलांवर तुम्ही नसतानाही लक्ष ठेवण्याचं काम करतात. अर्थात, तुमच्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी काही GPS ट्रॅकिंग ॲप उत्तम कामगिरी बजावतात. असच एक ॲप म्हणजे Findmykids. (Find My Kids location tracker) या ॲप चा वापर करून तुम्ही तुमच्या मुलाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊ शकता.

Findmykids ॲप कसे काम करते | working of Find My Kids location tracker app

Findmykids हे Android आणि iOS सिस्टम मधे चालणारे चाइल्ड ट्रॅकिंग ॲप आहे जे दर 15 मिनिटांनी फोनचे स्टेटस बघून मुलाचे लोकेशन कळवते. हे ॲप स्मार्टफोन आणि इंटरनेट कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजेच WiFi आणि मोबाइल चा वापर करून GPS सेन्सरच्या साहाय्याने मुलाचे लोकेशन निश्चित करते.

Findmykids चे फायदे

  • Find My Kids location tracker ॲप द्वारे मुलाचे अचूक लोकेशन कळते
  • Find My Kids location tracker हे ॲप वापरण्यास ही अगदीच सोपे आहे. जे स्मार्टफोन किंवा पीसी वापरतात त्यांना हे ॲप सहज वापरता येईल.
  • मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी एकापेक्षा अनेक डिव्हाईस तुम्ही या ॲप द्वारे कनेक्ट करू शकता.
  • या ॲप चा कंट्रोल पूर्णपणे तुमच्या हातात असतो.
  • या ॲप मधे फक्त पालकांनाच सगळे अधिकार असतील, मुलं या ॲप द्वारे काही बदल करू शकत नाहीत.

हे ॲप वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?

  • आजकाल मोठ्या स्क्रीन आणि सतत इंटरनेट ॲक्सेस असलेले डिव्हाईस वापरात नसणारी व्यक्ती क्वचितच सापडेल. हे ॲप वापरण्यासाठी पालकांकडे iOS किंवा Android स्मार्टफोन गॅझेट असणे आवश्यक आहे.
  • दुसरा स्मार्टफोन किंवा GPS घड्याळ. तुमच्या मुलाकडे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडे जिच्यावर तुम्ही ॲपद्वारे लक्ष ठेवणार आहात, त्याकडे दुसरे डिव्हाइस असणे आवश्यक आहे.
  • सर्वच पालक काही आपल्या लहान मुलांना महागडे फोन घेऊन देत नाहीत, कारण लहान वयात मुलांना स्वतःची जबाबदारी व्यवस्थित घेता येत नाही आणि असं असताना एवढे महागडे मोबाईल मुलांच्या हातात देणं जोखमीचे काम आहे, कुणीही सहज मुलांच्या हातून असे डिव्हाईस चोरून घेऊ शकतात. अशा परिस्थितीत मुलांना मोबाईल फोनच्या जागी घड्याळ देणे हा सर्वोत्तम पर्याय ठरेल.

Find My Kids location tracker ॲप असं करा इंस्टॉल आणि असा करा वापर

Findmykids ॲप वापरण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा:

  • तुमच्या मुलाच्या ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांचे लोकेशन माहीत करून घेण्यासाठी पालकांनी आपल्या स्मार्टफोनवर Findmykids इंस्टॉल करा. त्यासाठी तुम्ही GooglePlay किंवा AppStore चा वापर करू शकता.
  • त्यांनतर मुलाच्या मोबाईल किंवा स्मार्ट घड्याळावर पिंगो ॲप इंस्टॉल करा. या ॲप मधे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला एक otp येइल.
  • हा मिळालेला otp कोड तुमच्या मुलाच्या फोनमध्ये प्रविष्ट करा.
  • तुमच्या तुमच्या मुलाचे/मुलीचे नाव टाईप करून, त्यांचा फोटो सेट करून आणि मुलाची इतर माहिती देऊन त्यांचे खाते तयार करा. लक्षात ठेवा की ही माहिती फक्त तुम्हालाच दिसेल.
  • एकदा हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर, ॲप तुम्हाला तुमच्या मुलाचे लोकेशन अचूकपणे ट्रॅक करण्यासाठी फोनची सेटिंग्ज कशी बदलायची ते दाखवेल.
  • यांनतर या ॲप चे इंस्टॉलेशन पूर्ण होईल आणि तुम्ही Findmykids ॲप वापरू शकता.

या ॲप मधे पुढे तुम्ही लोकेशन चेक करून त्यांचे सध्याचे लोकेशन शोधण्यासाठी रिक्वेस्ट करून मुलाचे लाईव्ह लोकेशन तपासू शकता. या ॲप द्वारे तुम्ही ज्या ठिकाणी तुमची मुलं सेफ राहतील अशा काही विशिष्ट जागा सुद्धा सेट करून ठेऊ शकता आणि जर तुमची मुलं त्या जागेच्या बाहेर गेले तर, तुमचं मूल सुरक्षित क्षेत्राबाहेर गेलं आहे असा मेसेज पालकांच्या फोनवर पाठविला जाईल.

याव्यतिरिक्त, Find My Kids location tracker ॲप वर इतर गोष्टीही उपलब्ध आहेत, जसे की तुम्ही या ॲप वर रिक्वेस्ट करून मुलाच्या आसपास आवाज रेकॉर्ड करू शकता, मुलाच्या फोनची बॅटरी किती आहे हे तपासू शकता, आणि सोबतच इतर अनेक पर्याय देखील इथे उपलब्ध आहेत.

Findmykids ॲपने kidSAFE+ COPPA-प्रमाणित स्टॅम्प मिळवला आहे. हे प्रमाणपत्र पालकांना या ॲपवर पूर्ण विश्वास ठेवण्यासाठी प्रवृत्त करते. सोबतच या ॲप द्वारे कुटुंबांना उच्च दर्जाचे संरक्षण आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. किडसेफ सील प्रोग्रामने असा द्वावा केला आहे की Findmykids हे ॲप “ऑनलाईन सिक्युरिटी आणि प्रायव्हसी च्या गोष्टींची पूर्तता करते.”

मुलांसाठी कोणती गोष्ट सुरक्षित आहे हे ठरवण्यासाठी वेबसाइट्स, ॲप्स, आणि इतर गोष्टींची टेस्ट करून त्यानुसार माहिती देण्याचं काम किडसेफ सील प्रोग्राम करतो.

जर तुम्हाला ही तुमची मुले कुठे खेळत आहेत किंवा कुठे गेली आहेत याबद्दल सतत काळजी वाटत असेल आणि तुम्हाला ही काळजी कायमची मिटवून टाकायची असेल तर काळजी करणं सोडूनच द्या. तुमच्या फोनवर Findmykids चाइल्ड ट्रॅकिंग ॲप इंस्टॉल करा आणि तुमच्या मुलांच्या लोकेशन ची माहिती मिळवत राहा. या ॲप मुळे तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या मुलाच्या सोबत नसताना ही सोबतच असाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!