Download Maharashtra Voter List 2024: या सोप्या पद्धतीने करा मतदार यादी डाऊनलोड! जाणून घ्या सविस्तर!

Maharashtra Voter List 2024: महाराष्ट्रामधील लोकसभेच्या 48 जागांसाठी पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा अशा चार टप्प्यांत मतदान होणार आहे. आणि महाराष्ट्र सीईओ मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहे, यामुळे राज्यातील ज्या लोकांना येणाऱ्या निवडणुकीमधे मतदान करायचे आहे ते आपले नाव या यादीमधे सहज शोधू शकतात आणि सोबतच ते ही मतदार यादी डाउनलोड देखील करू शकतात. तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला आजच्या या लेखाद्वारे महाराष्ट्र मतदार यादी 2024 शी संबंधित संपूर्ण माहिती देणार आहोत, जर तुम्हाला ही यादी डाऊनलोड करायची असेल तर कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा. Maharashtra Voter List 2024

Maharashtra Voter List 2024
Maharashtra Voter List 2024

वयाची 18 वर्षे पूर्ण होताच मतदानात सहभागी होणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे, सोबतच होणाऱ्या निवडणुकीमधे सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शवणे सुद्धा आवश्यक आहे, जेणेकरून नागरिक आपल्या इच्छेनुसार सरकार स्थापन करण्यात सहकार्य करू शकतील. त्यामुळे सर्वप्रथम भारताचे नागरिक म्हणून मतदार यादीतील आपले नाव तपासून पाहणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आणि जर तुमचे नाव महाराष्ट्राच्या मतदार यादीत दिसत असेल तर आणि तरच तुम्ही आगामी निवडणुकीत मतदान करू शकणार आहात. तुमचे नाव मतदान यादीत न आल्यास तुम्हाला या वर्षी मतदान करता येणार नाही. मतदार यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्हाला इतर कोठेही बाहेर जाण्याची गरज भासणार नाही कारण आता महाराष्ट्र मतदार यादीतील तुमचे नाव तुम्ही घरबसल्या ऑनलाइन सहज पाहू शकणार आहात.

Maharashtra Voter List 2024 Objectives

महाराष्ट्राच्या मतदार यादीत नाव पाहण्यासाठी पूर्वी लोकांना अनेकवेळा शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. अशा परिस्थितीत त्यांना अनेक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागत होता, तसेच त्यांचा बराचसा वेळ फक्त याच कामात वाया जात होता. मात्र आता या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक वेब पोर्टल सुरू केले असून, त्याद्वारे राज्यातील नागरिक आता घरी बसून इंटरनेटच्या माध्यमातून मतदार यादीतील आपली नावे ऑनलाइन तपासू शकणार आहेत, आणि यामुळे त्यांच्या वेळेची बचत देखील होणार आहे.

Maharashtra Voter List 2024 Benefits

 • जर महाराष्ट्राच्या मतदार यादीत तुमचे नाव असेल तरच येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला मतदान करता येणार आहे.
 • आता लोकांना घरबसल्या महाराष्ट्राच्या मतदार यादीतील नाव पाहता येणार असून त्यांना सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही.
 • मतदार यादीतील नावे ऑनलाइन तपासल्याने लोकांचा वेळही वाचणार आहे.
 • ज्या लोकांनी मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी नुकताच अर्ज केला असेल ते देखील या यादीत त्यांची नावे शोधू शकणार आहेत.
 • या पोर्टलद्वारे लोक फोटोसह त्यांचे मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकणार आहेत.

How to download Maharashtra Voter List 2024?

 • सगळ्यात आधी तुम्हाला सीईओ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
 • एक होम पेज तुमच्या समोर ओपन होईल. या होम पेजवर तुम्हाला Final Electtrol Roll चा ऑप्शन दिसेल.
 • या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • या पेजवर तुम्हाला जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, भाग इत्यादी गोष्टी भराव्या लागतील.
 • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला ओपन पीडीएफ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
 • या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Maharashtra Voter List 2024 ची PDF ओपन होईल. ती डाऊनलोड करा.

महाराष्ट्र मतदार यादीतील नाव तपासण्याची प्रक्रिया

 • सगळ्यात आधी तुम्ही सीईओ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
 • यानंतर तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल.
 • या होम पेजवर तुम्हाला मतदार यादीत नाव शोधा हा ऑप्शन दिसेल. तुम्हाला यावर क्लिक करायचे आहे.
 • या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • या पेजवर तुम्हाला तुमच्या search name wise किंवा search ID card असे दोन पर्याय दिसून येतील.
 • या दोन पर्यायांमधून तुम्ही जर search name wise हा ऑप्शन निवडला असेल तर तुमच्यासमोर Search your Name in District or Assembly हा पर्याय ओपन होईल.
 • इथे तुम्हाला, तुमचा जिल्हा, नाव, आडनाव, मधले नाव आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सर्च बटणावर क्लिक करायचे आहे.
 • आणि जर तुम्ही दुसरा पर्याय निवडलात, तर तुम्हाला जिल्हा, ओळखपत्र क्रमांक आणि नंबर टाइप करून सर्च बटणावर क्लिक करायचे आहे.

वरील सोप्या स्टेप्स वापरुन तुम्ही Maharashtra Voter List 2024 मध्ये नाव तपासू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!