Check Your Name In Voter List 2024: मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे का? नाही? तर मग असं तपासा मतदार यादीतील तुमचं नाव!

Check Your Name In Voter List 2024: मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे का? नाही? तर मग असं तपासा मतदार यादीतील तुमचं नाव!:  आपल्या सर्वांना माहीतच असेल की लोकसभा निवडणूक २०२४ जवळ आली आहे. सर्व पक्षांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. यंदाच्या ह्या निवडणुकीमधे ५० लाखांहून अधिक नवीन मतदार त्यांच्या आवडत्या नेत्याला निवडून संसदेत पाठवणार आहेत. तुम्हालाही या लोकसभा निवडणुकीत मतदान करायचे असेल आणि तुमचे मतदार ओळखपत्र अजूनही बनलेले नसेल, तर आजच्या या लेखात आम्ही सांगितलेल्या पद्धतीचा वापर करून आजच नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करा. असेही अनेक लोक असू शकतात ज्यांनी आधीच अर्ज केलेले असतील, मात्र त्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही याबद्दल त्यांना काहीही माहिती नसेल. चला तर मग आता आपण याबद्दल अधिक माहिती पाहूया: Check Your Name In Voter List

Check Your Name In Voter List 2024
Check Your Name In Voter List 2024

नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज कसा कराल?

 • यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट वर क्लिक करून ती वेबसाईट ओपन करायची आहे.
 • यानंतर मतदार सेवा पोर्टलवर (NVSP) क्लिक करून
 • नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज वर क्लिक करावे लागणार आहे.
 • आता पुढे तुम्हाला जन्मतारीख, पत्ता आणि जन्म प्रमाणपत्र याची माहिती व्यवस्थित भरून सबमिट बटणावर वर क्लिक करायचे आहे. Election 2024

अर्ज केल्यानंतर काय करावे?

मतदार ओळखपत्रासाठी अर्ज केल्यानंतर फॉर्ममध्ये तुम्ही जो ईमेल आयडी दिला असेल त्यावर एक ईमेल येईल. या ईमेलमध्ये एक लिंक दिली असेल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मतदार ओळखपत्राचे स्टेटस तपासू शकता. साधारण एका महिन्याच्या आत तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र मिळून जाते, किंवा तुम्ही ते तुमच्या बूथ लेव्हल ऑफिसर किंवा बीएलओशी संपर्क साधून मिळवू शकता. Check Your Name In Voter List

मतदार ओळखपत्र न मिळाल्यास काय करावे?

तुम्हाला जर अर्ज केल्यानंतरही मतदार ओळखपत्र मिळाले नसेल किंवा बीएल कडून फोन आला नसेल, तर तुम्ही जवळच्या निवडणूक कार्यालयात किंवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाइटवर जाऊन मतदार ओळखपत्राचे स्टेटस तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुम्ही ज्या राज्यातील रहिवासी आहात त्या राज्याची मतदार यादी (Check Your Name In Voter List) ऑनलाइन तपासावी लागेल.

मतदार ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा हायस्कूल मार्कशीट या कागदपत्राची आवश्यकता लागेल. या सर्वांच्या आधारावर तुमचे मतदार ओळखपत्र बनवले जाते

Voter ID & Aadhar link

मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डच्या मदतीने तयार केले गेलेले नाही, तर त्यांना मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करावे लागेल. मतदानातील होणारी फसवणूक टाळण्यासाठी मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड हे एकमेकांशी लिंक केले जात आहेत. हे काम ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येते. जर तुम्हाला हे काम ऑनलाइन करायचे असेल तर तुम्हाला NVSP पोर्टलवर जावे लागेल आणि जर तुम्ही आधार कार्ड वापरून मतदार ओळखपत्र बनवले असेल तर तुम्हाला त्याची काही गरज लागणार नाही. Check Your Name In Voter List

मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल?

 • स्टेप 1: सगळ्यात आधी तुम्हाला इलेक्टोरल सर्च या वेबसाइटवर जावे लागेल.
 • स्टेप 2: वेबसाइटच्या मेन पेज वर, तुमची माहिती  जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय असतील, पहिला पर्याय म्हणजे तुमचा EPIC क्रमांक टाइप करून तुम्ही ही माहिती जाणून घेऊ शकता आणि दुसरा पर्याय म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती भरून देखील तुम्ही याबद्दल जाणून घेऊ शकता.
 • स्टेप 3: तुम्ही पहिला पर्याय निवडल्यास, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दाखवलेला तुमचा EPIC क्रमांक, राज्य आणि CAPTCHA code तिथे भरावा लागेल आणि सर्च वर क्लिक केल्यावर, जर तुम्ही नोंदणीकृत मतदार असाल, तर तुमची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल.
 • स्टेप 4: तुम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीनुसार सुद्धा याबद्दल जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, वय, जन्मतारीख, राज्य, जिल्हा आणि तुमचा मतदारसंघ यासारखी माहिती देऊन सर्च ह्या बटणावर क्लिक करायचे आहे. तुम्ही जर नोंदणीकृत मतदार असाल, तर तुम्हाला तुमची सर्व माहिती स्क्रीन वर दिसून येईल. Election 2024

असे तपासा यादीतील तुमचे नाव:

 • यासाठी सगळ्यात आधी तुमच्या राज्याच्या निवडणूक वेबसाइटला भेट द्या.
 • यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि मतदार ओळखपत्र क्रमांक ही माहिती भरा आणि सर्च बटणावर क्लिक करा.
 • एकदा का तुम्ही सर्च बटणावर क्लिक केलं की त्यांनतर, तुम्ही दिलेल्या माहितीशी जुळणाऱ्या प्रोफाइलची सर्व लिस्ट तुम्हाला समोर दिसून येईल.
 • त्यानंतर तुमचे नाव निवडा आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यावर क्लिक करा. जर तुम्हाला तुमचं मतदार ओळखपत्र ऑनलाइन सुद्धा सापडत नसेल, तर अशावेळी तुम्ही तुमच्या जवळच्या निवडणूक कार्यालयाला भेट देणं योग्य ठरेल.

Check Your Name In Voter List

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!