औरंगाबादेत पार्किंगसाठी ‘या’ ७ ठिकाणी हमखास मिळणार जागा; सुरुवातीची दोन महिने मोफत असणार पार्किंग..

औरंगाबाद शहराला मागील काही वर्षांपासून पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासन पार्किंगचे धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न करीत होते. अंत: या प्रयत्नांना यश आले असून, औरंगाबाद शहरात ७ ठिकाणी पार्किंग सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे नागरिकांना याची सवय लागावी म्हणून सुरुवातीचे दोन महिने पार्किंग मोफत राहणार आहे.

महाराष्ट्र सरकारने पार्किंगचे धोरण निश्चित करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून फक्त बैठकांवर बैठकाच होत होत्या, धोरण काही केल्या निश्चित होत नव्हते. पण आता प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दोन वर्षांपासून पार्किंगच्या विषयावर काम सुरू करून उपायुक्त अपर्णा थेटे आणि स्मार्ट सिटीच्या टीमला जबाबदारी सोपविली होती. अखेर दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे धोरण निश्चत करण्यात आले.

पुण्याच्या संस्थेला दिले काम

पुण्यातील मेट्रोची पार्किंग सांभाळण्याचा अनुभव असलेल्या कार्बलेट पार्किंग ॲण्ड सर्व्हिसेसला (carblate parking and services) काम देण्याचा निर्णय असून महापालिका लवकरच या संस्थेसोबत करार करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये संस्थेची नेमणूक २४ महिन्यांसाठी करण्यात येणार आहे, आणि जर का काम चांगले असेल तर करार वाढवून दिला जाणार आहे.

संपूर्ण जबाबदारी संस्थेची असणार

पार्किंग-झोन, नो-पार्किंग, फ्री-पार्किंग झोन असे प्रकार यामध्ये असतील. ठिक-ठिकाणी असले साईन बोर्ड लावणे, वेब ॲप तयार करणे, नागरिकांकडून पैसे जमा करणे या सारखी कामे संस्थेकडे असतील. प्रारंभीचे दोन महिने पार्किंग मोफत राहील. त्यानंतर ३० टक्के रक्कम संस्थेने स्वत:कडे तर उर्वरित ७० टक्के मनपाला मिळेल.

दुसरा टप्पाही लवकरच होणार

शहागंज, औरंगपुरा, पैठणगेट आदी भागांमध्ये दुसऱ्या टप्प्यात पार्किंग सुरू करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील वेगवेगळ्या भागांत सुद्धा पार्किंग झोन तयार केले जाणार आहेत.

Similar Posts