अंघोळ करत असताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून ओढत शेतात नेले, अन्..

16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये अंघोळ करीत असल्याचे पाहून 21 वर्षीय नराधमाने तिचे तोंड दाबून ओढत शेतात नेऊन बला.त्कार केल्याची संतापदायक घटना गंगापूर तालुक्यातील गवळी-शिवरा गावात घडली.

अनिकेत ज्ञानेश्वर चव्हाण उर्फ अन्या वय-21 वर्ष (रा. गवळीशिवरा, ता. गंगापूर) या आरोपीला शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे 4:30 ते 5 वाजेच्या सुमारास अल्पवयीन पीडित मुलीला अंघोळीसाठी बाथरूम मध्ये जाताच आरोपी अन्याने पीडितेचे तोंड दाबून तिला ओढत जवळच्या शेतात घेऊन गेला. तेथे तिला जीवे मारण्याची धमकी देऊन पाशवी बला त्कार केला व पळून गेला .

झालेल्या या घाबरलेल्या मुलीने घडलेली घटना तिच्या घरच्यांना सांगितली. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक (पोक्सो) अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!