Atal Pension Yojana मोदी सरकारची नवीन योजना! आता दर महिन्याला मिळणार 5 हजार रुपये, लगेच करा नोंदणी..

Atal Pension Yojana

Atal Pension Yojana Government Scheme in Marathi: प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपलं आयुष्य सुखाचं जावं. यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही प्रयत्न करत असतो. काहीजण नोकरी करत असतानाच या सर्व गोष्टींसाठी आर्थिक नियोजन करून ठेवत असतात. एफडी, म्युच्युअल फंड, शेअर्स, बॉण्ड्स, सोनं इत्यादींमध्ये गुंतवणूक करून पैसे बचत करण्यावर सगळ्यांचाच भर असतो.

नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन मोदी सरकारने एक योजना सुरु केली आहे. या योजनेचं नाव ‘अटल पेन्शन योजना’.. अटल पेन्शन योजनेअंतर्गत बचत करून नागरिक दर महिन्याला 1 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली ‘अटल पेन्शन योजना’ सुरू केली. ‘Atal Pension Yojana’

Atal Pension Yojana या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात..?

‘अटल पेन्शन योजना’ ही प्रामुख्याने 18 ते 40 वर्षं वयोगटातल्या नागरिकांसाठी आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिक अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. या योजनेच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. (Atal Pension Yojana Age Limit)

येथे उघडा अकाउंट

देशात अटल पेन्शन योजनेची लोकप्रियता चांगलीच वाढलेली आहे. या योजनेत 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती अकाउंट उघडू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बॅंकेशी किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट उघडावे लागेल. (Atal Pension Yojana Application Form)

Atal Pension Yojana असे मिळणार दर महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन..

या योजनेचा लाभ 40 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेत 20 वर्षांसाठी एक ठराविक रक्कम तुम्हाला गुंतवावी लागते. ज्या व्यक्तीने गुंतवणूक केली आहे त्या व्यक्तीला वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. (Atal Pension in Marathi)

या योजनेचं आर्थिक गणित एकदम सोपं आहे. जर तुम्हाला 60 वर्षांनंतर 5 हजार रुपये पेन्शन पाहिजेत असेल, तर दर महिन्याला 210 रुपये गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही या योजनेत 20 वर्षें ठराविक गुंतवणूक करून पेन्शनचा लाभ घेऊ शकता. अटल पेन्शन योजना नागरिकांसाठी महत्वकांक्षी ठरली आहे. (Atal Pension Details in Marathi)

या योजनेचा लाभ 18 ते 40 वर्षें वयोगटातील घेऊ शकतात. आतापर्यंत या योजनेत 2021-22 आर्थिक वर्षात देशातील 71 लाख नागरिक सहभागी झाले आहेत. यावरून तुम्हाला समजून जाईल की, या योजनेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!