बायकोला माहेरी सोडायला आला अन् मेहुणीला घेऊन पळाला; अजब जावयाची गजब करामत…

औरंगाबाद जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात असलेल्या घोंदलगावमध्ये पत्नीला माहेरी सोडायला आलेल्या जावयाने 17 वर्षीय अल्पवयीन मेहुणीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. जावयाच्या या कृत्यामुळे सासुरवाडीमधील मंडळीचे डोळे चक्रावले आहे. या प्रकारानंतर सासरच्या मंडळींनी पोलीस ठाणे गाठून जावयाची तक्रार केली. याप्रकरणी जावयासह त्याच्या सहकारी मित्रांविरुध्द वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर माहिती अशी की, घोंदलगाव येथील एका कुटुंबामधील मुलीचे दीड वर्षापूर्वी वैजापूर तालुक्यातीलच कापूस-वाडगाव येथील तरुणाशी लग्न झालं. सासुरवाडी जवळच असल्याने त्याचे नेहमी सासुर-वाडीला येणं-जाणं सुरू असायचे. पण आपलाच जावई एक दिवस आपल्या अल्पवयीन मुलीला पळवून नेईल याची पुसटशी कल्पनाही सासरकडील मंडळींना नव्हती. पण जावयाने जे केलं त्यानंतर सासरच्या मंडळींना मोठा धक्का बसला.

दिनांक 9 मे 2022 रोजी आरोपी जावई आपल्या पत्नीला माहेरी सोडण्याकरिता घोंदलगाव येथे मुक्कामासाठी आला होता. लेक आणि जावई आल्यावर सासरच्या मंडळींनी थाटामाटात त्यांना जेऊ घातले. जेवण झाल्यावर सर्व कामे आटोपून सासरची मंडळी झोपी गेली.

सकाळी जागे झाल्यानंतर जावई आणि त्यांची अल्पवयीन 17 वर्षीय मुलगी घरातून गायब झालेली त्यांना दिसली. त्यानंतर त्यांनी गावातील नातलगांसह दोघांचाही खूप शोध घेतला. परंतु ते काही सापडले नाही.

दोघांचा शोध सुरू असतानाच सासरच्या लोकांना आरोपी जावयाचा फोन आला, मोबाईल वर जावयाने सांगितले की मी तुमच्या मुलीला रात्री 12 वाजता माझ्या सोबत घेऊन आलो आहे. आणि आम्हाला लग्न करायचे आहे 10 हजार पाठवा अशी मागणी या जावायाने केली. जावयाने ही मागणी ऐकून सासरच्या मंडळींच्या पायाखालची जमीनच सरकली, आणि त्यांनी याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये केली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजब जावई आणि त्याच्या मित्रांवर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!