प्लास्टिक इंजीनियरिंग

प्लास्टिक इंजीनियरिंग मध्ये करियरची सुवर्णसंधी

प्रिय शिक्षक/पालक / विद्यार्थी

विषय : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीचे online प्रवेश अर्ज सुरु झाल्या बाबत


सेन्ट्रल इंस्टीट्युट ऑफ़ पेट्रोकेमिकल्स इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी (सिपेट) औरंगाबाद, रसायन व पेट्रोरसायन विभाग, रसायन व खाते मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एक राष्ट्रीय स्वायत्त संस्था आहे. सिपेट संस्था ISO 9001 : 2015 मानांकन प्राप्त असून या संस्थेमध्ये AICTE मान्यता प्राप्त तसेच MSBTE Equivalent प्लास्टिक्स इंजीनियरिंग डिप्लोमा, पोस्ट डिप्लोमा, पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमाचे अभ्यासक्रम चालविले जातात. सदरील अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.

आज आपण बघतो की प्लास्टिक चा वापर हा प्रत्येक क्षेत्रात होत आहे जसे की, कृषी, पायाभूत सुविधा, ग्राहक वस्तू, दूरसंचार, वाहन, पॅकेजिंग आणि वैद्यकीय उपकरणे इत्यादी. विशेषतः मेडीकल क्षेत्रात करोनाशी लढण्यासाठी लागणारे PPE कीट, फेस मास्क, ई. हे प्लास्टिक पासूनच बनविण्यात येते आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरणाऱ्या प्लास्टिक च्या वस्तूंची मागणी हि वाढतच जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. तसेच जे तरुण या क्षेत्राकडे डोळसपणे बघून नवीन उद्योग करण्यास इच्छुक असतात अश्या तरुणांना/उद्योजकांना सिपेट तर्फे तांत्रिक सहाय्यता दिली जाते.
सिपेट औरंगाबाद येथे १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी
Diploma in Plastics Technology (DPT)
Diploma in Plastics Mould Technology (DPMT)
हे तीन वर्षाचे कोर्स चालविले जातात

व B.Sc च्या विद्यार्थ्यांसाठी–
Post Graduate Diploma in Plastics Processing & Testing (PGD-PPT)
हा २ वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे

तसेच ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनीरिंग मध्ये डिप्लोमा केला असेल अश्या विद्यार्थ्यांसाठी
Post Diploma in Plastics Mould Design with CAD/CAM (PD-PMD) हा १८ महिन्याचा कोर्स करता येतो.
सदरील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी सिपेट तर्फे online प्रवेश परीक्षा घेण्यात येते, व या परीक्षेच्या निकालानुसार संबंधित अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येतो. या परीक्षेसाठी खाली दिलेल्या लिंक वर आपण नोंदणी करू शकतात. प्रवेश परीक्षा १९ जून २०२२ रोजी घेण्यात येणार असून ५ जून २०२२ पर्यंत अर्ज सादर करता येतील.
बारावी झालेल्या विध्यर्थ्यांसाठी Direct Second year ला Admission भेटेल.
online प्रवेश अर्ज भरण्याची लिंकhttps://cipet2022.onlineregistrationform.org/CIPET/
अधिक माहितीसाठी संपर्क साधा – 9923185048
सिपेट, औरंगाबाद
प्लॉट नं. J-3/2, MIDC चिकलठाणा, औरंगाबाद- ४३१००६
ई-मेल- [email protected]
वेबसाईट – www.cipet.gov.in
महत्वाची सूचना : Application Form पूर्ण भरून झाल्यानंतर form ची PDF 9923185048 या मोबाइल नंबर वर Whatsapp करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!