बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज कसे मिळवाल जाणून घ्या

नमस्कार मंडळी, आज आपण बँक ऑफ महाराष्ट्रच्या वैयक्तिक कर्जा (Personal Loan) बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्याज दारापासून ते लोन घेण्यासाठी काय पात्रता आणि निकष पाहिजे जाणून घ्या.

बँक ऑफ महाराष्ट्र ज्या योजनेंतर्गत पर्सनल लोन देते या योजनेला ‘महाबँक पर्सनल लोन’ Mahabank Personal Loan असे म्हटले जाते. या योजनेंतर्गत दिलेल्या लोनची रक्कम हि लग्न, आर्थिक गरज, घराचे नूतनी-करण, सुट्टी किंवा वैद्यकीय प्रक्रियेसह कोणत्याही वैयक्तिक खर्चासाठी वापरत येते. महाबँक पर्सनल लोनवर बँक आकर्षक व्याज दर आणि विविध फायदे देते. चला जाणून घ्या महाबँक योजनेची सविस्तर माहिती.

बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोनच्या ठळक बाबी
Bank Of Maharashtra Personal Loan Highlights

◆ व्याज दर (Interest Rate) – 8.90% दरसाल
◆ लोन रक्कम मर्यादा – 20 लाख
◆ लोनचा कालावधी (Tenure)- 5 वर्षांपर्यंत
◆ पगारदारांसाठी:- 7 वर्षांपर्यंत
◆ लोनचा उद्देश/कारण – प्रवास, वैद्यकीय आणीबाणी, शिक्षण, लग्न आणि प्रवास यासह सर्व वैयक्तिक खर्च
◆ क्रेडिट स्कोअर – 700 पेक्षा जास्त

तुमचा क्रेडिट स्कोअर जाणून घेण्यासाठी क्लिक करा

बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन फायदे आणि वैशिष्ट्ये

◆ कमी व्याज दर: बँक ऑफ महाराष्ट्र भारतातील इतर बँकेच्या तुलनेत कमी व्याजदर ऑफर करते.
◆ कमी EMI : महाराष्ट्र बँक तुम्हाला कमी EMI ठेवण्याची सुविधा देते, पगारदार व्यक्तींना पर्सनल लोन 7 वर्षांच्या कालावधीसाठी आणि इतर व्यक्तींना 5 वर्षांसाठी मिळू शकते.
◆ कमीत -कमी कागदपत्रे: तुम्ही कमी कागदपत्रांमध्ये तुमचे पर्सनल लोन घेऊ शकता.
◆ जमीनदार शिवाय लोन: तुमचे पगारखाते जर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असेल आणि तुमचा सिबिल स्कोर हा 700 च्या वरती असेल तर तुम्हाला कोणत्याही गेरन्टॉर शिवाय तुम्हाला लोन मिळू शकते.
◆ कोणतेही छुपे चार्जेस नाही: बँक पर्सनल लोन वर कोणतेही छुपे चार्जेस किंवा दंड बँक आकारात नाही.

बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन चार्जेस/ शुल्क
Bank Of Maharashtra Personal Loan Fees & Charges

◆ लोन प्रोसेस चार्जेस (Loan processing fee) – लोन रकमेच्या 1% पर्यंत, 1,000/- रु. पर्यंत

◆ प्री-पेमेंट/पार्ट-पेमेंट चार्जेस (Pre-payment/Part-payment charges) शून्य

◆ दस्तऐवजीकरण चार्जेस कर्जाच्या रकमेच्या 0.20% + GST

बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन पात्रता निकष
Eligibility Criteria for Bank Of Maharashtra Personal loan

◆ तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. वय 60 वर्षे पेक्षा जास्त असू नये.
◆ तुमचे दरमहा उत्पन्न कमीत कमी 25,000/- रु असले पाहिजे.
◆ केंद्र / राज्य कर्मचारी. PSUs / सार्वजनिक किंवा खाजगी कंपन्या / प्रतिष्ठित कॉर्पोरेट / MNCs यांचे पगारखाते असलेल्या ग्राहकांना लोन भेटू शकते.
◆ बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पगार खाते नसलेल्या पगारदार अर्जदारांसाठी, पगारातून मासिक कर्जाचे हप्ते वजा करण्यासाठी अन्डर्टेकिंग तुम्हाला द्यावे लागेल.
◆ स्वत:चा व्यवसाय असलेले स्वयंरोजगार व्यावसायिक (केवळ डॉक्टर, सीए आणि आर्किटेक्ट) जर ते गेल्या 1 वर्षापासून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (क्रेडिट सुविधेसह) बँकिंग करत असतील तर ते पर्सनल लोन घेऊ शकतात.

बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे
Documents Required for Bank Of Maharashtra Loan

◆ ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स
◆ रहिवासी (Address) पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, टेलिफोन बिल (लँडलाइन)
◆ इतर कागदपत्रे नोकरदारसाठी: मागील तीन महिन्याची सॅलरी स्लिप / सॅलरी सर्टिफिकेट
मागील 2 वर्षांच्या आयटी रिटर्नच्या प्रती, फॉर्म 16 सह
◆ मागील 6 महिन्यांचे पगार खात्याचे स्टेटमेंट (इतर बँकेच्या बाबतीत)
◆ इतर कागदपत्रे स्वयंरोजगार / व्यवसायिक: आयटी रिटर्नची नवीनतम 3 वर्षांची (व्यावसायिकांच्या बाबतीत 2 वर्षे) बॅलन्स शीट सह, शॉप ऍक्ट / कंपनी लाईन्स, मागील एक वर्षाचे बँक स्टेटमेंट

FAQ
◆ बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोनसाठी CIBIL स्कोअर किती असावा?
– बँक ऑफ महाराष्ट्रकडून पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा किमान CIBIL स्कोर 700 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

◆ मला बँक ऑफ महाराष्ट्रकडून किती पर्सनल लोन मिळू शकते ?
-बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांना त्यांच्या मासिक पगाराच्या 20 पट पर्सनल लोन देते आणि जास्तीत जास्त 20 लाखापर्यंत देते. उदा. समजा तुमचा पगार 30 हजार आहे, तर तुम्हाला 6 लाखापर्यंत लोन मिळू शकते आणि त्याचा कालावधी हा 7 वर्षांपर्यंत असू शकतो.

◆ बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोनसाठी किती पगार असणे आवश्यक आहे?
-बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोनसाठी तुमचे दरमहा उत्पन्न कमीत कमी 30,000/- रु असले पाहिजे.

◆ स्वयंरोजगार/व्यवसायिक व्यक्तीला बँक ऑफ महाराष्ट्रचे पर्सनल लोन मिळू शकते का?
-होय, स्वयंरोजगार/व्यवसायिक व्यक्तीला पर्सनल लोन मिळू शकते. फक्त त्याचा CIBIL स्कोअर 700 पेक्षा जास्त असावा आणि तुम्ही (डॉक्टर, सीए आणि आर्किटेक्ट) असायला आहे आणि तुम्ही बँक खाते लोन न घेता वर्षभर वापरलेले असावे.

◆ बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पर्सनल लोनच्या प्रीपेमेंटवर काही निर्बंध आहेत का?
-बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पर्सनल लोनच्या प्रीपेमेंटवर कोणतेही निर्बंध नाहीत. बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जासाठी प्रीपेमेंट शून्य शुल्क आकारते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!