औरंगाबाद पुन्हा हादरले! देवगिरी महाविद्यालयापासून 200 फूट फरफटत नेऊन 19 वर्षांच्या तरुणीची निर्घृण हत्या.

देवगिरी महाविद्यालय परिसरात एकतर्फी प्रेमातून सीखप्रित कौर नामक तरुणीची आज दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान देवगिरी कॉलेज परिसरात हत्या केल्याची घटना घडली आहे. नराधमाने भर दिवसा देवगिरी कॉलेजमधून तिला बळजबरी 200 फूट खेचत नेले. आणि त्यानंतर धारदार शस्त्राने गळा चिरून तिची हत्या केली. या घटनेनंतर देवगिरी कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग (वय 19) असे हत्या झालेल्या विद्यार्थींनीचे नाव असून ती BBA च्या प्रथम वर्गात शिकत होती. आज दुपारी घडलेली ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण औरंगाबाद शहरात पसरली, या खळबळजनक घटनमुळे पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

घटनास्थळ

या घटनेनंतर आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात एक मुलगा विद्यार्थिनीला ओढून नेत असताना दिसत आहे. विद्यार्थीनीच्या खुणामुळे औरंगाबादेत खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर आरोपी शरण सिंग पसार झाला असून, पोलिसांची 3 पथके त्याच्या मागावर आहेत. विशेष म्हणजे घटनास्थळाचा परिसर नेहमीच विद्यार्थी व नागरिकांनी गजबजलेला असतो. पण, जीवाच्या भीतीमुळे कुणीही विद्यार्थिनीला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. तूर्त, या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

मृत विद्यार्थिनी व मारेकरी हे दोघेही उस्मानपुरा भागातील असून ते एकमेकांना ओळखत होते. ते दोघे जण देवगिरी महाविद्यालय परिसरातील एक कॅफेत बसलेले असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे कॅफे-चालकाने त्यांना बाहेर जाण्यास सांगितले.

पाहा विद्यार्थिनीला ओढत नेतानांचा व्हिडिओ..

दोनशे फूट नेले ओढत

हत्येपूर्वी आरोपीने तिला 200 फूट ओढत नेऊन तिचा गळा कापून खून केला. मृत विद्यार्थीनी आणि मारेकरी एकाच समाजाचे आहेत. दोघेंही शहरातील उस्मानपूरा या परिसरात राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!