MS धोनीने IPL २०२२ पूर्वी CSK चे कर्णधारपद सोडले…

लोक म्हणाले, तू नेहमीच आमचा ‘कॅप्टन कूल’ राहशील

महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली ४ वेळा चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल ट्रॉफी दिली आहे. सीएसकेने धोनीसह अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा, सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि अष्टपैलू मोईन अली यांना कायम ठेवले होते. माहीने IPL २०२२ आधी कर्णधारपद सोडुन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. धोनी २००८ पासून CSK चे नेतृत्व करत होता.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) याने आयपीएल (IPL २०२२) च्या १५ व्या हंगामाच्या सुरुवातीच्या २ दिवस आधी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीच्या जागी रवींद्र जडेजा सीएसकेचा नवा कर्णधार असेल. माहीच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर धोनीच्या या निर्णयावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून म्हणजेच २००८ पासून धोनी सीएसकेचे नेतृत्व करत होता. धोनीच्या अनुपस्थितीत सुरेश रैनाने अनेकवेळा सीएसकेचे नेतृत्व केले आहे.

रवींद्र जडेजा CSK फ्रँचायझीचा दुसरा पूर्णवेळ कर्णधार असेल. भारताच्या या अनुभवी अष्टपैलू खेळाडूचा आयपीएलमध्ये खूप चांगला रेकॉर्ड आहे. जडेजा 2012 पासून CSK चा भाग आहे. आता रैना आता CSK चा भाग नसल्यामुळे धोनीने जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. CSK ने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याची पुष्टी केली आहे. तथापि, या काळात एमएस धोनी यष्टीरक्षक म्हणून CSK ला आपली सेवा देत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!