मोबाईल मध्ये तसले व्हिडिओ पाहून 2 अल्पवयीन मुलींवर 5 तरुणांचा सामूहिक ब. ला. त्का. र.
पटणा (ABDnews) 9 मार्च: महिलांचा सन्मान व्हावा म्हणून काल जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला गेला. मात्र खरचं महिला इतक्या सुरक्षित आहेत का? असा प्रश्न बिहारच्या घटनेने उपस्थित झाला आहे.
बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यातील बारबिघा पोलिस स्टेशन परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
5 अल्पवयीन मुलांनी 2 अल्पवयीन मुलींवर सामूहिक ब. ला. त्का. र केला. याबाबत सदरील घटनेतील पीडितेच्या आजीने सहा अल्पवयीन मुलांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुन्हा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदरील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतले तर 4 मुले फरार झाली. हे 6 अल्पवयीन मुले असे घृणास्पद कृत्य करण्यापूर्वी मोबाईलमध्ये पॉ. र्न व्हिडिओ पाहत होते.
मोबाइल मध्ये “तसले” व्हिडिओ पाहल्यानंतर केले कृत्य
पोलिसांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी हे सहा मित्र 5-6 वाजेदरम्यान एका ठिकाणी मोबाईलवर पॉ. र्न व्हिडिओ पाहत होते. त्यानंतर त्यांच्या मनात विकृत कृत्य करण्याची इच्छा जागृत झाली. त्यामुळे त्यांनी शेजारील गावातील दोन मुलींना धरुन आणले, आणि सामुहिक ब. ला. त्का. र केला.
सामुहिक दुष्कर्म केल्यानंतर जेव्हा दोन्ही मुलींनी रडण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपी मुलांनी त्यांना तीन रुपये दिले. सदरील प्रकार कोणालाही न सांगण्यास बजावले. जेव्हा मुली घरी आल्या तेव्हा, त्या रडत होत्या. त्यानंतर त्यांच्या आजीने त्यांना विचारले असता, त्यांनी सदरील घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सदरील घटनेतील सर्व मुले अल्पवयीन असून, त्याचे वय 10 ते 12 या वयोगटातील आहे. घटने नंतर सोमवारी उशिरा रात्री पीडित मुलींच्या आजीने पोलिस तक्रार दिली आहे. सध्या दोन्ही पीडित मुलींना मेडिकलसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.