औरंगाबादमध्ये भोंग्याबाबत पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती..

मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर मसेने प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे.

पण, या सभे पूर्वी औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी भोंग्याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. सर्व प्रार्थना स्थळी भोंगे लावण्याची तातडीने परवानगी घ्यावी, यामुळे औरंगाबादमध्ये सुद्धा आता भोंग्याचा नाशिक पॅटर्न लागू होणार आहे.

औरंगाबाद मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी चालू आहे. या सभेमध्ये राज ठाकरे मशिदीवरील भोंग्यांबद्दल बोलणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

राज्यामध्ये लाऊडस्पीकरवरून विविध मुद्दे समोर येत असतानाच औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी भोंगे लावायचे असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी असे आवाहन केले आहे. आणि जर कुठेही विनापरवाना भोंगे आढळून आले तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सुद्धा गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

लाऊडस्पीकर संदर्भात मा. सर्वोच न्यायालयाने 2005 मध्ये आणि राज्य सरकारने जो काही GR काढला आहे त्यानुसार लाऊडस्पीकर अधिकृत परवानगीविना लावता येत नाही, अशी माहिती देखील पोलिस आयुक्त गुप्ता यांनी दिली.

Similar Posts