Land record document : 1880 पासूनचे जुने सात-बारा फेरफार उतारे पाहा तुमच्या मोबाईलवर, जाणून घ्या..

Land record online Maharashtra :जमीन आणि जमिनीचे व्यवहार हा मुद्दा खूपच संवेदनशील असल्याने जमिनी संबंधीची सगळी कागदपत्रे यांना देखील खूप महत्त्व आहे. कारण खूप दिवसापासून जमिनीचे बरेच मालक बदललेले असतात, त्या अनुषंगाने आपल्या जमीन खरेदी विक्रीच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. नसता उगाचच आर्थिक फसवणूक होऊन आपल्याला मानसिक संताप येण्याची वेळ येऊ शकते. (Ferfar utara in marathi online)

आणि त्यामुळे विनाकारणच वाद होऊन हा वाद पुढे कोर्ट कचेरीच्या दारात गेल्यामुळे आपला बराच वेळ तर जातोच शिवाय पैसा देखील प्रचंड प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्या पूर्वी संबंधित जमिनीची सगळी माहिती तुम्ही असणे अत्यंत गरजेचे आहे व ही संपूर्ण माहिती तुम्हाला फक्त त्या जमिनीचे फेरफार, सातबारा आणि खाते उतारा या माध्यमातूनच मिळू शकते. Land record old document

आता तुम्ही म्हणाल की इतक्या जुन्या वर्षाचे रेकॉर्ड आणि त्या रेकॉर्ड land record मधून कागदपत्रे कुठे शोधायचे? मात्र याबाबत तुम्हाला आता कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नसून सन 1880 सालापासूनचे सगळे रेकॉर्ड महसूल हे भूमि अभिलेख कार्यालयामध्ये उपलब्ध असून राज्य शासनाच्या तर्फे ही सगळी माहिती/सगळे कागदपत्रे आता ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा ही कागदपत्रे सहजपणे डाऊनलोड करून ठेवू शकता. या लेखामध्ये आपण ही कागदपत्रे कशी मिळवायची याबद्दलची माहिती घेऊ. (Satbara online Maharashtra)

तुमच्या मोबाईलवर या पद्धतीने काढा 1880 सालापासूनचे फेरफार उतारे आणि महत्त्वाची कागदपत्र ferfar online Maharashtra

1- सगळ्यात आधी aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर भेट दिल्यावर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल.

2- ओपन झालेल्या पेजवर ई रेकॉर्ड्स E-Records पाहण्यासाठी तुम्हाला E-Records या पर्यायावर क्लिक केल्यावर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे पृष्ठ तुमच्यासमोर ओपन होईल.

3- त्या पेजवरील उजव्या बाजूस असलेल्या भाषा या पर्यावरून तुमची भाषा निवडावी.

4- नंतर डाव्याबाजूच्या चौकटीत Login व Help असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. जर तुम्ही अगोदरच त्या संकेतस्थळावर तुमची आगोदरच नोंदणी केली असेल तर तुम्ही LOGIN ID व PASSWORD चा उपयोग करून या साइटवर जाऊ शकतात. पण जर का तुम्ही नोंदणीच केली नसेल तर तुम्ही नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे.

5- नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमची सगळी माहिती व्यवस्थित भरावी.

6- म्हणजेच तुमचा व्यवसाय, तुमचा ई मेल आयडी, जन्मतारीख इत्यादी माहिती भरल्यावर पत्या विषयीचे रकाने सविस्तर भरून घ्यावे.

7- त्याचबरोबर संकेतस्थळाच्या निर्देशानुसार LOGIN ID तयार करून दिलेल्या निर्देशानुसार PASSWOED टाकावा.

8- त्यानंतर चौकटीमध्ये काही प्रश्न विचारले जातील, त्यातील कुठल्याही एका प्रश्नाचे उत्तर देऊन कॅपच्या या चौकटीत दिलेली अक्षरे जशीच्या तशी टाईप करावी व शेवटी सबमिट बटन दाबावे.

9- लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जे युजरनेम आणि पासवर्ड टाकला असेल तोच लॉगिन करण्यासाठी वापरावा.

या पद्धतीने पाहा सातबारा/फेरफार उतारा ferfar satbara utara online Maharashtra

1- aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिलेल्या जिल्ह्यांपैकी तुमचा जो जिल्हा असेल तो निवडा, नंतर तुमचा तालुका तसेच गावाचे नाव व फेरफार उतारा, सातबारा आणि ८-अ उतारा इ. प्रकारचे जवळजवळ 58 अभिलेखांच्या दस्तावेजांचे प्रकार यामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहेत.

2- त्यानंतर संबंधित जमिनीचा गट क्रमांक टाकावा व सर्च म्हणजे शोध या पर्यायावर यावे.

3- त्यानंतर तुम्ही ज्या जमिनीचा गट क्रमांक टाकला आहे त्या जमिनीच्या संबंधित फेरफारशी संपूर्ण माहिती तुम्हाला दिसते.

4- तुम्हाला सदर जमिनीचा कुठल्या वर्षाचा फेरफार पाहायचा आहे त्याचे वर्ष व क्रमांक या ठिकाणी तुम्हाला ज्या वर्षाचा फेरफार पाहिजे आहे त्यावर ून तुम्ही त्या वर्षाचा फेरफार पाहू शकता.

5- त्यानंतर प्रिव्हू कार्ट म्हणजेच पुनरावलोकन कार्ट या पर्यावर जावे व त्यानंतर तुमचे कार्ट ओपन होते व त्याखाली पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाउनलोड सारांश हे पेज ओपन होते व इथे तुमच्या फाईलची स्टेटस तुम्हाला मिळते.

6- यानंतर तुम्ही समोरील फाईल पहा या पर्यावर क्लिक केलं की तुमचे जमिनीचे फेरफार पत्रक तुमच्यासमोर ओपन होते.

आता तुम्ही हा उतारा तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ठेवू शकतात..

Similar Posts