Aadarsh Pathsanstha Scam :आदर्श पतसंस्थेत ठेवी असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी..

aadarsh pathsanstha scam : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत एन-6 सिडको औरंगाबाद या पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास आबाजी मानकापे व इतरांनी पतसंस्थेतील ठेवीदारांचे तब्बल 202,24,63,960/-रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन सिडको येथे गु.र.नं. 454/2023 व 455/2023 MPID कलम 406, 409, 420, 465, 467, 468, 471, 120 (ब), 217, 34 भादंवि सह कलम 3 महराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हित संबंधाचे संरक्षण अधिनियम 1999, सह कलम 21 व 23 अनियंत्रीत जमा योजना प्रतिबंधक कायदा-2019 अन्वये गुन्हे दाखल असून मा. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचे आदेशाने तपासकामी विशेष तपास स्थापन केलेले असून मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संभाजी पवार हे विशेष पथकासह तपास करीत आहेत.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार, खातेदारांचे ठेव रक्कम, पैसे त्यांना परत मिळवुन देण्याच्या अनुषंगाने विशेष तपास पथकाकडून गुन्हयाचा तपास व कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्या ठेवीदार, खातेदारांची फसवणुक झालेली आहे अशा तक्रारदारांचे अर्ज स्विकारण्यासाठी पोलीस स्टेशन सिडको येथे विशेष एक खिडकी कक्ष स्थापन स्थापन करण्यात आला होता. सदरचा विशेष कक्ष आता मा. पोलीस आयुक्त कार्यालय, मील कॉर्नर छत्रपती संभाजीनगर येथील आवक जावक शाखा या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येत आहे.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार, खातेदार यांनी त्यांचे तक्रारी अर्ज यापुढे मा. पोलीस आयुक्त कार्यालय, मील कॉर्नर छत्रपती संभाजीनगर येथील आवक-जावक शाखा या ठिकाणी द्यावेत असे त्यांना आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!