govt valuation of land | जमिनीची खरेदी व विक्री करण्यापूर्वी शासकीय भाव पहा मोबाईलवर

govt valuation of land

govt valuation of land : सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी-विक्री केली जात आहे. अनेकजण आपले पैसे गुंतवून ठेवण्यासाठी किंवा आपल्या मालमत्तेत वाढ करण्यासाठी जमीन खरेदी करून ठेवतात. तसेच काही सरकारी प्रकल्पात जातात. जसे – महामार्ग, धरण किंवा इतर कोणत्याही सरकारी प्रकल्पांमध्ये.. तर तुम्हाला यामध्ये जमिनीचे सरकारी भाव माहिती असणं आवश्यक असते.

अनेकजण घाईघाईने जमिनीची खरेदी विक्री करतात. यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तुम्हाला कुठे जमिनीची खरेदी करायची असेल किंवा एखाद्या शहरात दुकानासाठी व ऑफिससाठी गाळा खरेदी करायचा असेल, तर जमिनीचे शासकीय भाव माहित असायला हवे. तुम्ही कुठे ही जमीन खरेदी किंवा विक्री करत असाल, तर त्यापूर्वी शासकीय भाव माहिती करून घ्या. (govt value of land)

आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, जमिनीचे शासकीय भाव कुठे पाहायचे? जमिनीचे सरकारी भाव पाहण्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. आता अगदी तुम्ही मोबाईलवर जमिनीचे शासकीय भाव पाहू शकाल. मोबाईलवर जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊ या.. (Land Rate Check in Mobile)

असे पहा जमिनीचे सरकारी भाव govt valuation of land

click here abdnews

सर्वप्रथम https://igrmaharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जा.
या वेबसाईटवर डाव्या बाजूला महत्वाचे दुवे हा रकाना दिसेल. तिथे मिळकत मूल्यांकन या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाला ज्या जिल्ह्यातील जमिनीचा शासकीय भाव पाहायचा असेल त्या जिल्ह्यावर क्लिक करून तालुका आणि गाव निवडा.
ही माहिती निवडल्यानंतर, त्या गावातील जमिनीचे सरकारी भाव पाहायला मिळतील.
येथे तुम्हाला जिरायत, बागायत, एमआयडीसी अंतर्गत येणारी जमीन, हायवेवरील जमीन व इतर कोणत्याही जमिनीचे शासकीय भाव पहा. ‘Land Record’

अशाप्रकारे तुम्ही मोबाईलवर कोणत्याही जमिनीचे सरकारी भाव मोबाईलवर पाहू शकता. (How to Check Government Land Price in Mobile) जमीन खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी जमिनीचे शासकीय भाव पाहून घ्या अन्यथा तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते. ही माहिती अतिशय महत्वाची आहे. आपण थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे इतरांना नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!