पिंपरी-चिंचवडमध्ये ९७ तलवारी जप्त; कुरिअरद्वारे औरंगाबाद, अहमदनगरला पाठवल्या जाणार होत्या..

औरंगाबाद शहरात आज DTDC कुरिअर कंपनीमधून 3 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा पिंपरी-चिंचवड येथे दिघी येथील कुरिअर कंपनीत देखील मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आल्याने खबळबळ उडाली आहे.

जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यामध्ये तब्बल ९७ तलवारी, दोन कुकरी आणि ९ म्यान असा एकूण तीन लाखांपेक्षा जस्त किमतीचा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.

हा सर्व शस्त्रसाठा औरंगाबाद आणि अहमदनगर येथे पाठवण्यात येणार होती. मात्र त्याअगोदरच पोलीस पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला. या प्रकरणी पंजाब येथील उमेश सूद आणि मनिंदर, औरंगाबाद येथील अनिल होण, अहमदनगर येथील आकाश पाटील अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश सूद आणि मनिंदर यांनी आरोपी अनिल होन व आकाश पाटील यांना कुरियर द्वारे तलवारीचा साठा पाठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी DTDC कंपनीमध्ये छापा मारून एकूण ९७ तलवारी २ कुकरी आणि ९ म्यान जप्त केले आहेत.

दिघी येथे DTDC कुरिअर कंपनीचे वितरण केंद्र असून तेथूनच ह्या तलवारी औरंगाबाद आणि अहमदनगर येथे पाठवण्यात येणार होत्या. एवढा मोठा प्रमाणावर तलवारी कशासाठी मागवण्यात येत आहे याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!