अचानक जमीन दुभंगली आणि एकापाठोपाठ एक आत पडले लोक..

फोनवर बोलत असताना एका व्यक्तीसोबत घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, एक व्यक्ती फोनवर बोलत असताना काही सेकंदातच त्याच्या बरोबर एक दुर्घटना घडली. फोनवर बोलणारी व्यक्ती एका बाजूला वळताच तिथल्या जमिनीमध्ये अचानक एक मोठा खड्डा पडतो. व फोनवर बोलत असलेला माणूस त्या खड्यात पडतो.

सदरील प्रकार लक्षात आल्यावर आजूबाजूचे लोक त्याच्या मदतीला धावतात. मात्र जेव्हा हे लोक जेव्हा त्याला मदतीचा हात द्यायला जातात तेव्हा त्यांच्या सुद्धा पायाखालील जमिनही दुभंगते आणि तेही खाली बनलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडतात. त्यानंतर एका व्यक्तीने प्रसंगावधान राखत या सर्वांना बाहेर काढले.



सोशल मीडियावर हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, व्हिडिओ पाहणारेही आश्चर्यचकीत होत आहेत. एकदम सपाट असलेली जमीनिमध्ये अचानक खड्डा पडून आपण त्यामध्ये पडू, असं कुणालाही वाटलं नव्हतं. अगदी काही सेकंदांपूर्वी हे लोक जिथे उभे राहून गप्पा मारत होते, तीच जमीन काही दुभंगून हे सर्वजण त्यात सामावले गेले. त्यानंतर त्या खड्ड्यातील पाण्यात हातपाय मारून ते स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. आतापर्यंत हा व्हिडीओ १५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!