औरंगाबादमध्ये तब्बल १५ दिवसांपासून नागरिकांना पिण्याचे पाणी नाहीये, शहरात भाजप कार्यकर्त्यांसह महिलांचा भव्य हंडा मोर्चा..

मागील काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील सिडको-हडको भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची प्रश्न निर्माण झाला असून पंधरा दिवसांपासून या परिसरातील नळांना पाणी येत नाहीये.

औरंगाबाद : शहरामधील सिडको परिसरामध्ये भाजपच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चाला सिडको-हडको परिसमधील नागरिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. मागील काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील सिडको-हडको परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून मागील पंधरा दिवसांपासून सदरील परिसरात नळांना पाणीच आलेले नाहीये.

तर इतर काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे आज नागरिक व भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे. यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला. सदरील आंदोलन हे भाजपाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून या आंदोलनात सर्वसामान्य नागरिक, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

तसेच मनपा आयुक्त सतीश कुमार पांडे यांना सिडको परिसरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यात यावे. दूषित पाणी पुरवठा सुधारित करण्यात यावा, सिडको परिसरात आतील नागरिकांवर ते मनपा प्रशासन करीत असलेले अन्याय बंद करण्यात यावे. अशा विविध मागण्याचे निवेदन सिडको हडको परिसरातील भाजपा शाखाच्या वतीने देण्यात आले आहे. सदरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता,

सदरील आंदोलनाचे पोलीस प्रशासनाच्या वतीने छायाचित्रण करण्यात आले आहे. सिडको परिसरातील पाण्याच्या टाक्या समोर चिस्तिया कॉलनी येथे हे आंदोलन आज रोजी संपन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!