Dairy Farm Anudan Yojana | दुध व्यवसायासाठी सरकारकडून 33 टक्के अनुदान, योजनेचा लाभ असा घ्या..

Dairy Farm
Dairy Farm

Dairy Farm Anudan Yojana Maharashtra: प्रत्येक व्यक्तीला वाटते की, आपल्याकडे चांगल्या प्रमाणात पैसा असावा. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून कमाई करत असतात. अनेकजण व्यवसायाकडे वळताना दिसत आहे. तुम्ही देखील व्यवसाय करायचा विचार करत असाल, तर तुम्हाला खास माहिती देणार आहोत. तुम्ही दूध डेअरी व्यवसाय करून चांगली कमाई करू शकता.

तुम्ही जर शेतकरी असाल, तर डेअरी व्यवसाय Dairy Farm तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. कारण गाय, म्हैस, शेळी अशी जनावरे असल्याने याबाबत शेतकऱ्यांना माहिती असते. डेअरी व्यवसाय सुरू करायचा म्हटले की, यामध्ये पशुपालन आलेच.. पशुपालन करून तुम्ही दुधाचे उत्पादन वाढवू शकता. (Dairy farm project in marathi)

विविध व्यवसायाला चालना मिळावी व प्रोत्साहन मिळावी यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार अनुदान देत असते. आता केंद्र सरकार तुम्हाला मदत म्हणून दूध व्यवसायासाठी अनुदान देते. चला तर या केंद्र सरकारच्या खास योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या..

डेअरी व्यवसाय
अनेकजण काही ना काही व्यवसाय करत आहेत. जर तुम्हाला डेअरी व्यवसाय करायचा असेल, तर दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना चांगली कमाई करता यावी यासाठी केंद्र सरकारकडून 33 टक्क्यांपर्यंत अनुदान दिल्या जाते.

सरकार दुध व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. दुग्धव्यवसाय वाढविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार अनेक खास योजना राबवते‌. शेतकऱ्यांना 33 टक्के अनुदान नाबार्डमार्फत दिले जाते. (Dudh Dairy Anudan Yojana)

Dairy Farm योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बॅंक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • डेअरी स्टार्टअप प्रकल्प अहवाल

तुम्हाला डेअरी स्टार्टअपचा प्रकल्प अहवाल तयार करणं आवश्यक आहे. यामध्ये तुमच्या व्यवसायाचे मॉडेल कोणत्या पद्धतीचे आहे याबद्दल उल्लेख करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे व प्रकल्प अहवाल तयार करावा लागेल. ‘Dairy Farm Yojana’

Dairy Farm योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात..?

  • शेतकरी
  • वैयक्तिक उद्योजक
  • स्वयंसेवी संस्था आणि संघटित
  • असंघटित क्षेत्रातील कंपन्या आणि गट
  • संघटित क्षेत्रातील बचत गट
  • दुग्ध सहकारी संस्था
  • दूध संघ

एवढे अनुदान मिळणार..

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

click here abdnews

येथे क्लिक करा


या योजनेअंतर्गत डेअरी व्यवसायासाठी 33 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. डेअरी युनिटच्या कींमतीच्या 25 टक्के सर्वसाधारण वर्गासाठी आणि 33 टक्के अनुदान अनुसूचित जाती व जमाती मधील शेतकऱ्यांना दिले जाते. ‘Dairy Farm Anudan Yojana Maharashtra’

या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. या योजनेच्या अनुदानांबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. पुढील लिंकवर क्लिक करून नाबार्डच्या https://www.nabard.org/ अधिकृत वेबसाईटवर जा. तसेच ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!