Truecaller ला नवा पर्याय, आले स्वदेशी कॉलर आयडी अँप

Truecaller हे एक चायनिज अँप आहे हे सर्वांना माहित आहेच. मध्यंतरी भारत सरकार ने trucaller अँप ला बँन देखील केले होते. कारण त्या अँप वर लोकांचा डेटा चोरी करण्याचा आरोप सिद्ध झाला होता. असे असले तरी सध्या truecaller हे अँप पुन्हा सुरु झाले आहे. परंतु, हे अँप किती सुरक्षित आहे याचा नक्कीच विचार करायला हवा. truecaller अँप ला पर्याय उपलब्ध झाला आहे. तो देखील भरतील अँप चा. त्या अँप चे नाव आहे भारत कॉलर Bharat caller ID App. या लेखात आपण या नवीन भारतीय अँप बदल जाणून घेणार आहोत. तसेच ते डाउनलोड कसे करायचे ते देखील बघणार आहोत.

Bharat caller ID App Download सध्या अनेकांना अनोळखी लोकांचे, जाहिरातदारांचे किंवा स्पॅम कॉल येतात. काही आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल तुम्ही रिसीव्ह केल्यास आर्थिक भुर्दंड पडतो. तसेच, खंडणी किंवा धमकीवजा कॉलही केले जातात. त्यामुळे तुम्हाला आलेला कॉल नेमका कुणाचा आहे, ते जाणून घेण्यासाठी अनेकजण कॉलर आयडी अॅपचा वापर करतात. त्यातही सर्वाधिक वापरले जाणारे कॉलर आयडी अॅप म्हणजे ट्रू कॉलर. या अॅपच्या माध्यमातून आपल्याला आलेला कॉल नेमका कुणाचा हे जाणून घेता येते.

स्वदेशी कॉलर आयडी अँप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

मात्र, ट्रू कॉलर अॅपच्या विश्वासार्हतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून युजर्सच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट नंबर व इतर महत्त्वाची माहिती हॅक केली जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे ट्रू कॉलर अॅपला पर्याय म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा विद्यार्थी प्रज्वल सिन्हा आणि कुणाल पसरिचा यांच्या किकहेड सॉफ्टवेअर स्टार्टअप कंपनीने भारत देशी बनावटीचे कॉलर आयडी अॅप विकसित केले आहे. Bharat caller ID App भारत कॉलरचा सर्व्हर देशातच असून, या सर्व्हरवर युजर्ससे कॉन्टॅक्ट आणि कॉल लॉग साठवले जाणार नाहीत. युजर्सच्या प्रायव्हसीमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही. त्याशिवाय कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे युजर्सच्या फोन नंबर्सबाबत कोणताही डेटाबेस नसतो. अशा डेटापर्यंत ते पोहोचूही शकत नाहीत, असा दावा करण्यात आला आहे. भारत कॉलर अॅप गुगल प्ले-स्टोअर व अॅप-स्टोअर वरून निःशुल्क डाऊनलोड करता येते. प्रज्वल सिन्हा आणि कुणाल पसरिचा यांच्या या संशोधनाबद्दल आणि कामगिरीबाबत गेल्यावर्षी राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डेटा इन्क्रिप्शनचा वापर

डेटा सिक्युरिटीसाठी भारत कॉलर अॅपचा संपूर्ण डेटा इन्क्रिप्टेड पद्धतीने साठवला जातो. त्यामुळे युजर्सच्या प्रायव्हसीची भारत कॉलरकडून विशेष काळजी घेण्यात येते. त्यांचा डेटा भारताबाहेर कोणीही वापरु शकत नाही. हे अ‍ॅप इंग्रजीसह हिंदी, मराठी, तमीळ, गुजराती भाषांमध्येही उपलब्ध आहे.

स्वदेशी कॉलर आयडी अँप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

कॉलर आयडी अॅप म्हणजे काय? Bharat caller ID App

कॉलर आयडी अॅपच्या माध्यमातून तुम्हाला कोणी अनोळखी व्यक्ती कॉल करतो आहे, याची माहिती मिळते. त्याद्वारे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव ओळखता येते. तुमच्याकडे संबंधित व्यक्तीचा नंबर सेव्ह नसल्यास या अ‍ॅपद्वारे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण डिटेल्स मिळतील. स्पॅम नंबर असतील, तर त्याबाबतही पूर्वसूचना दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!