युट्यूबवर पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा; प्रात्यक्षिक VIDEO पाहून पोलिसही चक्रावले..

यूट्यूबवर व्हिडिओ पाहून प्रिंटरद्वारे बनावट नोटा बनवणाऱ्या जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथील तरुणाचा जामनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उमेश चुडामन राजपूत (२२) असे अटक आरोपीचे नाव आहे. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाने बनावट नोटा छापण्याचे प्रात्यक्षिक दाखवला. हे प्रात्यक्षिक पाहून पोलिसांना धक्काच बसला.

जामनेर तालुक्यातील पहूर बसस्थानक परिसरात गस्त घालत असताना हिंगणे बुद्रुक येथील उमेश राजपूत नावाचा युवक बनावट नोटा बनवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. चौकशीत युवक पहूर बसस्थानकाजवळ फिरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.

तरुणाची चौकशी केली असता त्याच्याकडे २०० रुपयांच्या तीन नोटा सापडल्या. एक नोट बनावट तर दोन खऱ्या होत्या. आधी तरूणाने बनावट नोटांबाबत अस्पष्ट उत्तर दिले. मात्र, खाकीचा हिसका दाखवताच कलर प्रिंटरवर रंगीत झेरॉक्स नोटा तयार करून बाजारात विकत असल्याची कबुली त्याने दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणे येथील तरुणाच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून तरुणांनी नोटा बनवण्यासाठी वापरलेला प्रिंटर, २०० रुपयांच्या ४५ नोटा, बनावट नोटा आणि नोटा बनवण्यासाठी कागद जप्त केला.

पाहा व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!