Business Idea : फक्त 50 हजारात सुरू करा हा 5 लाखांचा व्यवसाय; सरकारकडूनही मिळेल इतकी मदत

Business Idea

Business Idea : ​देशात आयुर्वेद आणि योगा आत्मसात करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. आयुर्वेद आपल्या प्राचीन संस्कृतीकडून मिळालेलं महत्वाचं ज्ञान आहे. कोणतेही दुष्परिणामांशिवाय आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा जगभरात सध्या चर्चा होत असते.

त्यामुळे बदलत्या काळानुसार आयुर्वेदिक गोळ्या/कॅप्सूल इत्यादींच्या निर्मितीसाठी संशोधन आणि विकास वाढला आहे. आजकाल आयुर्वेदिक उत्पादनांची मोठी बाजारपेठ आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात व्यवसायाची उत्तम संधी निर्माण झाली आहे. small business ideas

औषधी तेलाचा व्यवसाय
तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने मेडिकेटेड ऑइल मॅन्युफॅक्चरिंगचा पर्याय सूचवाला आहे. म्हणजेच तुम्ही औषधी तेल बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. युनिटची स्थापना करण्यासाठी सरकार पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत 90 टक्क्यांपर्यंत कर्ज आणि 25 टक्क्यांपर्यंत अनुदान देते.

प्रकल्प सुरू करण्यासाठी 50500 रुपयांची गरज online business ideas


खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) मेडिकेटेड ऑइल मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा अहवाल तयार केला आहे. त्या प्रकल्पासाठी 505000 रुपयांपर्यंत गुंतवणुकीचा खर्च आहे. आणि जर तुम्ही पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला फक्त 50500 रुपये खर्च करावे लागतील आणि उर्वरित 90 टक्के रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून दिले जातील. प्रकल्पाच्या खर्चामध्ये 1000 चौरस फूट इमारत शेड, मशिनरी-उपकरणे, खेळते भांडवल समाविष्ट आहे. या खर्चात तुम्ही एका वर्षात औषधीयुक्त तेलाच्या सुमारे 95500 बाटल्या तयार करू शकता. त्यासाठी एकूण खर्च 12,61,000 असेल. online business ideas

नफा किती होईल
सर्व खर्च साधारणत: 12.61 लाख रुपये असेल. 95500 बाटल्या विकून तुमची एकूण वार्षिक विक्री 15 लाख रुपयांची होईल. तुम्ही सुमारे 2.39 लाख रुपये नफा कमवू शकता. म्हणजेच दरमहा सुमारे 20,000 रुपये कमाई होऊ शकते. new business ideas

शासनाकडून प्रशिक्षणाची गरज


पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज देण्यापूर्वी सरकार व्यवसायाशी संबंधित प्रशिक्षणही देते. यामध्ये व्यवसायातील बारकाव्यांबरोबरच व्यवस्थापन आणि विक्रीच्या पद्धतीही शिकवल्या जातात. unique business ideas

येथे कर्जासाठी अर्ज करा
तुम्हाला मेडिकेटेड ऑइल युनिटसाठी कर्ज घ्यायचे असल्यास, तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा उद्योग केंद्राशी किंवा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा- https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp

Similar Posts