विराट कोहलीच्या निर्णयावर गौतम गंभीर म्हणाला, ‘कर्णधारपद हा कोणाचा जन्मसिद्ध हक्क नाही’..
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेट जगतातील सर्वच दिग्गजांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याला याबाबत विचारले असता त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमादरम्यान जेव्हा गौतम गंभीरला विचारण्यात आले की आपण नवीन विराट कोहली पाहू का? या प्रश्नाच्या उत्तरात गंभीर म्हणाला, ‘तुम्ही नवीन काय पाहणार आहात? कर्णधारपद हा कुणाचा जन्मसिद्ध…