औरंगाबादमध्ये राज्यमंत्र्यांच्याच कॉलेज मध्ये मास कॉपीचा प्रकार उघड..! बघा व्हिडिओ..

औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापुर येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये 12वीच्या परीक्षेच्या वेळेस धक्कादायक प्रकार उघडिस आला आहे. काल मंगळवारी हिंदीचा पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांकडून चक्क मास कॉपी होत असतानाचा पाहायला मिळाला.

या नॅशनल महाविद्यालयात परीक्षार्थी थेट बाकावरच पुस्तकाची पाने ठेवूनच उत्तरे लिहीत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे.

मागील महिन्यामध्ये दहावीच्या परीक्षे दरम्यान औरंगाबाद मध्ये खुलेआम कॉपी सुरू असल्याचे प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर विधानसभेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संबधीत शाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा करत, यापुढे सुद्धा परीक्षेदरम्यान कॉपी करताना जर कोणी आढळले, तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल अशी तंबी दिली होती.

तरी सुद्धा राज्यमंत्री यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये बारावीच्या परिक्षेदरम्यान मास कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता शिक्षणमंत्री आता नॅशनल महाविद्यालयावर काय कारवाई करतील? हे पाहणं महत्वाचे ठरेल.

बघा व्हिडिओ..

Similar Posts