सिबिल स्कोर म्हणजे काय? तो किती असावा आणि कसा तपासावा? How to check cibil score

How to check cibil score

How to check cibil score सिबिल स्कोअर (CIBIL) हा कर्ज घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. हा सिबिल स्कोअर म्हणजे काय? तर सिबिल स्कोअरचा फुल फॉर्म ” credit information bureau of Indian limited” असा होतो. म्हणजे मराठीमध्ये CIBIL ला ” क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड” असे म्हणतात. जेव्हा क्रेडिट कार्डचा विषय येतो तेव्हा सिबिल स्कोअर अतिशय महत्वाचा असतो. CIBIL स्कोअर आपल्या क्रेडिट कार्डची हिस्टरी दर्शवत असतो. सामान्यतः हा स्कोअर ३०० ते ९०० इतका गणला जातो. ३०० सर्वात कमी CIBIL स्कोअर असतो तर ९०० सर्वात जास्त CIBIL स्कोअर असतो. तीन आकडी असणारा हा CIBIL स्कोअर आपल्या क्रेडिट क्रेडिट कार्डची चांगली हिस्टरी दाखवत असतो. तुम्ही कर्जाची परत फेड किंवा क्रेडिट कार्डचे पेमेंट योग्य वेळेवर करत आहात हे CIBIL स्कोअर दर्शवतो. बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये CIBIL स्कोअरला महत्त्व असते.

CIBIL स्कोअर मुळे काय होते? तर CIBIL स्कोअर बँकेला समजत असतं की विशिष्ट व्यक्ती जे कर्ज मागत आहे त्याची परतफेड करण्याची योग्यता त्या व्यक्तीची आहे किंवा नाही. म्हणून बँक कर्ज देण्याआधी त्या व्यक्तीचा CIBIL स्कोअर बघते आणि मग कर्ज द्यायचं की नाही ते ठरवते. त्यामुळे कर्जाच्या माध्यमासाठी CIBIL स्कोअर अत्यंत महत्त्व असते. त्यासाठी CIBIL स्कोअर चांगला असणे गजरेचे आहे.

चांगला CIBIL स्कोअर म्हणजे किती? याविषयी माहिती मिळवण्यासाठी पुढील माहिती वाचा. How to check cibil score

७५० हा CIBIL स्कोअर चांगला असल्याचं मानलं जातं. जर या पेक्षा कमी CIBIL स्कोअर असेल तर कर्ज घेण्यास व्यक्तीला अडचणी येतात. ३०० पेक्षा कमी CIBIL स्कोअर असेल तर व्यक्तीला कर्ज मिळू शकत नाही. कर्ज देण्यासाठी व्यक्ती पात्र ठरत नाही. ३०० ते ४५० दरम्यानचा CIBIL स्कोअर ठीक समजला जाती. तरी कर्जासाठी व्यक्ती पात्र नसतो परंतु EMI वेळेत देऊन CIBIL स्कोअर सुधारू शकतात. ४५० ते ६०० दरम्यान CIBIL स्कोअर असेल तर तो सामान्य समजला जाऊन काही वेळा कर्ज मिळते तर काही वेळा मिळत नाही. जरी क्रेडिट कार्ड मिळाले तरी लिमिट कमी असते. ६०० ते ७५० हा CIBIL स्कोअर चांगला असून सगळ्याचं बँक कर्ज आणि क्रेडिट कार्ड सुद्धा देतात. पण मोठ्या प्रमाणात कर्ज मिळेलच हे शक्य नाही. CIBIL स्कोअर कर ७५० ते ९०० च्या दरम्यान असेल तर तुमचा रेकॉर्ड चांगला असतो त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सुद्धा कर्ज मिळू शकते.

CIBIL स्कोअर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

CIBIL स्कोअर कसा सुधारावा? यासाठी खालील माहिती वाचा.

  1. सर्वप्रथम सिबिल स्कोर चे परिक्षण करा जर तुमचा सिबिल स्कोअर हा चांगला असल्यास तुम्हाला आवश्यक असलेले कर्ज मंजुर होण्यास मदत होते. सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट स्थितीबद्दल माहिती दर्शवतो. तुम्हाला आपल्या सिबिल स्कोअरे परीक्षण करु इच्छित असल्यास तुम्ही तो तपासून घेऊ शकता.
  2. आपल्या क्रेडिट अहवालात त्रुटी मुक्त राहण्यासाठी नियमित स्कोअरचे परीक्षण केले पाहिजे. जर आपल्याला रिपोर्टमध्ये काही चूक आढळली तर त्याचे पुनरावलोकन वेळेत दुरुस्त करावे.
  3. आपल्या क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च करु नये आणि त्याची खात्री करुन घ्यावी. जर तुम्हाला सिबिल स्कोअर ७५० पर्यंत ठेवायचा असेल तर आपल्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या ५० टक्क्यांहून अधिक खर्च करणे टाळा.
  4. चांगला सिबिल स्कोअर ठेवण्यासाठी वेळेवर कर्जाचे किंवा क्रेडिट कार्डचे हफ्ते भरा. उशीरा पेमेंट टाळा. अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!