या ५ कारणांमुळे लहान वयातच पालकांशी उद्धटपणे वागतात मुलं..

Why Don’t Children Respect Their Parents : मुलं मोठी होत असतात तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये अनेक बदल घडत असतात. या परीस्थितीत कधी-कधी त्यांना स्वत:च्या भावना समजत नाही आणि काही गोष्टींवर त्यांना राग येतो किंवा ते आई-वडीलांचा अनादर करतात.

खरं म्हणजे लहान मुलं ही माती-सारखी असतात, तुम्ही त्यांना ज्या प्रकारे आकार देता, त्याप्रमाणेच ते घडतात. कदाचित हेच कारण असेल की जेव्हा मुलं पालकांचा अनादर करतो तेव्हा मात्र पालक स्वतःला दोष देत असतात. मुलाचे संगोपन करत असताना त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली आहे असे पालकांना वाटते. इतकेच नाही तर मुलाच्या या वागण्याने पालकांना खूप त्रास होतो. (5 Reason why kids stop respecting their parents)

कदाचित तुम्ही काही छोट्या-छोट्या चुका केल्या असतील ज्यामुळे तुमच्या मुलांच्या वागण्यामध्ये बदल होऊ लागला आहे. परंतु पाल्याने पालकांचा अनादर करण्यामागे इतरसुद्धा अनेक कारणे असू शकतात. (Reasons Why Kids May Start Disrespecting Parents)

वास्तविक पाहता मुलं जस-जसे मोठे होत जाते, तस-तसे त्यांची व्याप्ती वाढू लागते. पालकां-बरोबरच मित्र आणि बाहेरचे जगसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे स्थान घेऊ लागते आणि यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावरही दिसू लागतो. (How do you know if your child respects you)

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अश्याच काही कारणांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे मूलं पालकांसोबत उद्धटपणे वागतात.

1) मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणे

या जगामध्ये क्वचितच असे पालक असतील जे आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करत नसतील. बहुतेकवेळा पालक आपल्या पाल्यांना जे काही हवे असते ते देत असतात. एकदा मुलांना हवे ते मिळवण्याची सवय झाली की ते त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टींबरोबर तडजोड न करायला शिकतात. जेव्हा जेव्हा असे होते तेव्हा तेव्हा ते त्यांच्या पालकांबद्दलचा आदर गमावत असतात. एवढेच नाही तर त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही तर ते पालकांचा अनादर करू लागतात.

2) मुलांसोबत ओव्हर फ्रेंडली होणं

आजच्या काळामध्ये पालकांना मुलांचे मित्र बनण्याचा सल्ला दिला जात असल्यामुळे बहुतेक पालक मुलांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करत असतात. वास्तविक पाहता, मुलांनी त्यांच्या आयुष्यातील आणि त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट उघडपणे पालकांना सांगावी अशी इच्छा असते. पण यामुळे अनेकदा किरकोळ गैरसमज होतात आणि मुलं पालकांना हलक्यामध्ये घेतात, ज्यामुळे पालकांचा अनादर होतो. मुलांशी मैत्री करणे चांगले आहे पण याची मर्यादा पालकांना माहीत असली पाहिजे.

3) मुलांना खोटी आश्वासने देणे

अनेक वेळा मुलं एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करायला लागले तर पालक त्यांना समजावण्यासाठी खोटी आश्वासने देत असतात. त्यांना पटवून सांगण्यापेक्षा खोटी आश्वासने देणे जास्त योग्य समजतात. आणि जर पालक ते आश्वासन विसरलात खोट्या आश्वासनांमुळे मुले आपल्या पालकांवर अविश्वास ठेवतात आणि त्यांचा अनादर करू लागतात.

4 ) मूड स्विंग्स

मुलं मोठी होत असतात तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यातमध्ये अनेक बदल घडत असतात. या स्थितीत ते स्वत:च्या भावना समजून घेत नाही आणि त्यांना काही गोष्टींवर राग येतो किंवा ते आई-वडीलांचा अनादर करतात. म्हणून, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पालकांनी मुलांची मनाची स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करावा .

5) लक्ष न देणं

काही मुलांना त्यांच्या पालकांकडून विशेष लक्ष हवे असते. पण जेव्हा पालकांकडून मुलांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, तेव्हा मुलं त्यांच्या पालकांचा अनादर करू लागतात, कारण पालक त्यावर त्यांना त्वरित प्रतिक्रिया देतात. या स्थितीत अनादर केल्याने ते तुमचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करू लागतात. त्यामुळे मुलांची त्यांची वागणूक बदलू लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!