औरंगाबादेत पुन्हा कुरियर ने आल्या ३७ तलवारी; कुरियर कार्यालयावर पोलिसांचा छापा…

औरंगाबाद: शहरामध्ये पुन्हा एकदा कुरियरद्वारे तलवारी मागवल्याचे समोर आले आहे. आज क्रांती चौक पोलिसांनी निराला बाजार येथील DTDC कुरिअरच्या कार्यालयावर छापा मारत पार्सल बॉक्समध्ये असलेल्या एक कुकरी आणि ३७ तलवारी जप्त केल्या.

औरंगाबाद शहरमध्ये कुरिअरने तलवारी मागविण्यात आल्याची ही तिसरी घटना असून, या पार्सलवर औरंगाबाद आणि जालना येथील ७ ग्राहकांचे पत्ते आढळून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलिस आयुक्त (शहर विभाग) अशोक थोरात यांना खबऱ्या ने माहिती दिली की शहरामध्ये कुरिअरद्वारे तलवारी आले आहे. यावरून क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने निराला बाजार येथील DTDC कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकून तेथील व्यवस्थापक वाल्मिक जोगदंड याबद्दल विचारपूस केली असता जोगदंड यांनी असे कोणतेही पार्सल आले नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी कार्यालयात तपासणी केली असता पार्सलच्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर तलवारी आढळून आल्या.

त्या तलवारी ७ ग्राहकांनी मागवल्या होत्या. त्यामध्ये ५ जण औरंगाबाद तर दोन जण जालन्याचे रहिवासी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. दराडे यांनी दिली.

या पूर्वी देखील औरंगाबाद शहरामध्ये ऑनलाईन तलवारी मागून त्यांची विक्री करणाऱ्या इरफान उर्फ दानिश खान नावाच्या आरोपीला जिन्सी पोलिसांनी बेड्या ठोकत त्याच्या ताब्यातून तब्बल ४१ तलवारी दोन गुप्ती आणि सहा कुकरी असा शस्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!