शेतात लाईनची डीपी किंवा पोल असल्यास शेतकऱ्यांना मिळणार महिना 2 ते 5 हजार भाडे..
वीज आधिनियम 2003 कलम 57 नुसार ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज वितरण कंपनीचे डी.पी. किंवा वीजेचे पोल आहे त्या शेतकऱ्यांना 2 हजार ते 5 हजार रुपये मासिक भाडे देणे वीज नियमक मंडळाला बंधनकारक असते. मात्र, त्याकरीता संबंधित शेतकऱ्याने वीज नियामक मंडळाला अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र, याची सामान्य शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे आणि वीज नियामक मंडळाने याबाबत चुप्पी साधत असल्यामुळे या नियमांचे पालन होत नाही. या नियमाबाबत जनतेत जनजागृती करणे महामंडळाचे परम कर्तव्य आहे.
सामान्य नागरिकांनी किंवा शेतकऱ्याने वीज बील न भरल्यामुळे वीज महामंडळाकडून तात्काळ वीजेचे कनेक्शन कट केले जाते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डी.पी. आहे, त्याचे मासिक भाडे 5 हजार तर ज्या शेतकऱ्याच्या शेतातून विजेच्या तारा किंवा पोल गेलेले असतात त्या शेतकऱ्यांना 2 हजार रुपये वीज महामंडळाचे मासिक भाडे मिळते. यासाठी संबधित शेतकऱ्याने वीज महामंडळाकडे रितसर अर्ज करावा लागतो.
काय म्हणतो नियम
एखाद्या विज कंपनीला एका शेतामधून दुसऱ्या शेतामध्ये वीज न्यायची असेल तर स्टेशन, ट्रान्सफॉर्मर, डी.पी. आणि पोल जोडावे लागते. यामुळे शेताची बरीच जागा व्यापली जाते. तर या व्यापलेले जागेचे तुम्हाला मासिक 2 ते 5 हजार रुपये मिळू शकतात.
परंतु जर तुम्ही स्टेशन, ट्रान्सफॉर्मर, डी.पी. टाकत असताना संबंधित कंपनीला NOC सर्टिफिकेट दिलं असेल तर तुम्ही कंपनीकडून भाडे वसूल करू शकत नाही.
विज ग्राहकांचे इतर अधिकार जाणून घ्या..
▪️ नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून 30 दिवसात कनेक्शन मिळते
👉🏻 30 दिवसात कनेक्शन न दिल्यास प्रती आठवडा 100 रु. भरपाई ग्राहकास मिळते.
▪️ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्यास 48 तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे.
👉🏻 तसे न केल्यास प्रती ग्राहकाला प्रती तास रु. 50 रुपये भरपाई मिळते.
▪️ग्राहकाला स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे
👉🏻 विज कायदा 55 सेक्शन व परि. क्र. 17311 दि. 07/06/2005
▪️ सरासरी, अंदाजे किंवा मीटरचा फोटो न काढता (मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे हे बाकायदेशीर आहे
👉🏻 ग्रा. सं. कायदा 1983, परि.क्र. 13685 दि. 06/05/2005 भरपाई = प्रती आठवड्यास रु. 100
▪️थकबाकी, वादग्रस्त बिल यासाठी वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य
👉🏻 मीकविज कायदा 2003 सेक्शन 56 वीज ग्राहक अटी व शर्ती क्र. 15
▪️ वीज पोल ते मीटर पर्यंत केबल, पोल इ. खर्च शेतकऱ्याने केलेला असल्यास त्यांना परत मिळतो.
👉🏻 संबंधित सर्व खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो; वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.21 (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो)
▪️ नवीन वीज कनेक्शनसाठी लागणारे पैसे= घरगुती रु. 1500 ते रु. 200 व कृषी पंप रु. 5000
👉🏻 पोल, वायर, केबल, ई. खर्च वीज कंपनीनेच करायचा असतो.
▪️ गाव खेड्यात ( शिवारात ) शेतात रात्री घरात वीज असणे अनिवार्य
👉🏻 वीज वियमक आयोग आदेश त्यानुसार चौथा (4) योजना चालु.
▪️शेतात पोल किंवा डी.पी. असल्यास प्रतिमाह रु. 2000 ते रु. 5000 भरपाई (भाडे) मिळते
👉🏻 विज कायदा 2033 व लायसेंस रुल 2005
( मा. जिल्हा न्यायदंडाधिकारी विहित भरपाई देण्यास सक्षम अधिकारी)
▪️ शाळा, कॉलेज, हॉस्पिटल ईत्यादीचे कमर्शीअल वीज दर जादा असल्यास कमी करून मिळतो
👉🏻 M.E.R.C.आदेश केस क्र. 19/2012
( माहे ऑगस्ट 2012 पासून फरक परत मिळतो, कं.परि.क्र.175 दि. 05/09/2012 निर्णय दि. 16/08/2012)
▪️ मनुष्य, बैल-गाय, म्हैस इ. वीजेच्या धक्क्याने जखमी अथवा मेल्यास त्याची संपुर्ण भरपाई वीज कंपनीने द्यावयाची असते ( मनुष्यहानी झाल्यास रु. 5 लाख भरपाई)
👉🏻 मा. सर्वाेच्च न्यायालय केस क्र. 108 ऑप 2002 निर्णय दि. 11/01/2002 शकीलकुमारी विरुद्ध