दारूच्या नशेत डॉक्टरने घातला रुग्णालयात गोंधळ, बाजारसांवगीच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार. घटनेचा व्हिडिओ व्हायरल.

औरंगाबाद जिल्ह्यामधील खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगीच्या आरोग्यकेंद्रात एका डॉक्टरनेच नशेत बेफाम होऊन गोंधळ घालत उपचारासाठी आलेल्या रुग्णाला शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून सदरील घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की खुलताबाद तालुक्यातील बाजारसांवगीच्या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर दारूच्या नशेत फुल्ल होता.

याचवेळी आरोग्य केंद्रात उपचारासाठी एक रुग्ण आला असता तो डॉक्टर रुग्णाला शिविगाळ करू लागला. डॉक्टरच्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांना सदरील प्रकार समजल्यानंतर त्यांनी डॉक्टरला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.

तरी देखील हा डॉक्टर कोणाला जुमानत नसल्याने अखेर त्या डॉक्टरला धरून बाहेर नेण्यात आले. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडिओ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!